महाजनांचा पुतण्या, फडणवीस-शिंदेंचा जवळचा माणूस असल्याचे सांगत युवतीला गंडा, पोलीस दलात नोकरी ला

नाशिक गुन्हा: मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा पुतण्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) तसेच मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे माझ्या खूप जवळचे असून पोलीस दलात नोकरी लावून देण्याची आमिष युवतीच्या आईला वारंवार दाखवल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.

नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील औरंगपूर येथील स्वाती राजेंद्र चाबुकस्वार 19 वर्षीय युवतीची साडे चार लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अभिषेक प्रभाकर पाटील (रा. एकुलती, ता. जामनेर, जिल्हा जळगाव, हल्ली मुक्काम द्वारका, नाशिक) याला पोलिसानी अटक केली आहे. आरोपीला निफाड न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

महाजनांचा पुतण्या, फडणवीसांचा जवळचा माणूस असल्याची बतावणी

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील परंतु हल्ली मु. द्वारका (नाशिक) येथे असलेल्या आरोपी अभिषेक पाटील हा मार्च २०२२ पासून आजतागायत गोदाकाठ परिसरात मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या, गुलाबराव पाटील यांचा नातेवाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा जवळचा माणूस असल्याचे सांगत होता.

8 लाख रुपयांची मागणी

या माध्यमातून पोलीस प्रशासनात नोकरीला लावून देण्याचे नागरिकांना आमिष दाखवून देत होता. याबाबत काही नागरिकांना नोकरीचे आमिष दाखवून त्याने गंडाही घातला होता. यानंतर त्याने स्वाती राजेंद्र चाबुकस्वार (19, रा. बेघरवस्ती, औरंगपूर ता. निफाड) या तरुणीला पोलीस खात्यात नोकरीस लावून देतो, असे आश्वासन देवून स्वातीच्या आई वडिलांचा विश्वास संपादन करून तिला पोलीस करून देतो, त्याबाबत 8 लाख रुपयांची मागणी त्याने चाबुकस्वार कुटुंबाकडे केली होती.

पोलिसांकडून आरोपीला अटक

मंत्र्यांचा नातेवाईक असल्याने गोदाकाठ परिसरात महागडी चारचाकी वाहने घेऊन येत असल्याने आरोपी पाटील याच्यावर विश्वास ठेवून स्वातीच्या आई-वडिलांनी साडेचार लाख रुपये पोलीस होण्याच्या लालसेने दिले. स्वातीला पोलिसांचा खोटा गणवेश, खोटी नंबरप्लेट तयार करून विविध मान्यवरांकडून स्वातीचा पोलीस म्हणून सत्कार करून चांदोरी गावात व गोदाकाठ परिसरात राजेंद्र चाबुकस्वार यांची मुलगी पोलीस झाल्याची नागरिकांना बतावणी करत बनावट पोलीस कागदपत्रे तयार केले. तसेच मुंबई येथील दादर परिसरातील महाबीर पोलीस अकॅडमीत पोलीस ट्रेनिंग करता स्वातीला दाखल केले व परिसरात खोटी बॅनरबाजी करून चाबुकस्वार परिवाराचा विश्वास संपादन करून पैशांची फसवणूक केली. याप्रकरणी अभिषेक प्रभाकर पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Nashik Crime : माझ्यावर इन्कम टॅक्सची रेड पडलीय, बँकेतील 700 कोटी काढण्यास अडचण, घरखर्चासाठी पैसे द्या; नाशिकमध्ये तिघांकडून कोट्यवधी उकळले

आणखी वाचा

Comments are closed.