नाशिकच्या आमदार देवयानी फरांदेंची कॅफेवर धाड! नको त्या अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, कॅफेतील गैरप्र
नाशिक बातम्या: नाशिक शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरातील गंगापूर रोड परिसरात एका कॅफेवर तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरु असल्याची माहिती मिळताच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी छापा टाकला. त्यावेळी कॅफेमध्ये सुरु असलेले प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाच ते सहा प्रेमी युगुलांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सरकार वाडा पोलीस स्टेशन आणि गंगापूर रोड पोलीस स्टेशनच्या सीमा रेषेवर ‘अ’मोगलीज नावाचा कॅफे होता. गेल्या पाच वर्षापासून हा कॅफे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या कॅफेमध्ये काही कंपार्टमेंट करण्यात आले होते. मुलं-मुली तिथे अश्लील चाळे करत असल्याची माहिती देवयानी फरांदे यांना मिळाली होती.
कॅफेमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे
त्यानंतर देवयानी फरांदे यांनी या कॅफेवर धाड टाकली. यावेळी या कॅफेमध्ये तरुण-तरुणी अश्लील चाळे करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि पाच ते सहा प्रेमी युगुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आले. त्यांची सध्या चौकशी केली जात आहे. तसेच त्यांच्या पालकांना पाचारण करून त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. दरम्यान, नाशिक शहरात हे केवळ एकच ठिकाण नसून अनेक ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. मात्र याबाबत कारवाई होत नाही. त्यामुळे या कॅफेवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गोवर्धन परिसरात गोळीबार करणारे पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, मागील भांडणाची कुरापत काढून 22 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास नाशिकच्या गोवर्धन परिसरात गोळीबार करण्यात आला होता. घटनेनंतर सर्व संशयित आरोपींनी तलवारीचा धाक दाखवून शिवीगाळ करत पळ काढला होता. आता या गोळीबार प्रकरणात नाशिक तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोळीबार करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेतील सर्व आरोपी सराईत असल्याची माहिती मिळत असून यापूर्वी त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे.
https://www.youtube.com/watch?v=584HQMVOUCE
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.