नाशिकमधील एफडीएच्या कारवाईत नवा ट्विस्ट; ‘ते’ दोन ट्रक लुटण्याचा प्रयत्न, तीन जण पोलिसांच्या ता
नाशिक बातम्या: नाशिकमध्ये अन्न औषध प्रशासन विभागाने (FDA) केलेली कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. येवला (Yeola) परिसरात सुपारी घेऊन जाणाऱ्या ट्रकवर एफडीएने कारवाई करत सुमारे 58 हजार किलोची 2 कोटी रुपये किमतीची सुपारी जप्त केली होती. मात्र अन्न औषध विभागाने चार ट्रकवर कारवाई करत दोनच ट्रकवर कारवाई दाखवल्याचा संशय व्यक्त केला जात होता. इतर दोन ट्रकमध्ये देखील सुपारीच असल्याची माहिती ट्रकचालकाने माहिती होती. चार ट्रकवर कारवाई करत दोनच ट्रक का दाखवले याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत नवा ट्विस्ट आला आहे. (Nashik News)
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या येवला परिसरात अन्न व औषध प्रशासनाने केलेली कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडले होती. अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाबाहेर एकूण चार सुपारीने भरलेल्या ट्रक आणण्यात आल्या होत्या. मात्र दोन ट्रकवरच अन्न व औषध विभागाने कारवाई केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. ज्या दोन ट्रकवर कारवाई केली, त्या ट्रक अन्न व औषध प्रशासनाच्या गोडाऊनमध्ये पाठवण्यात आल्या. याच दरम्यान इतर ट्रक देखील औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले होते. दोन इतर ट्रकवरही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्याचे चालकांकडून सांगण्यात आले होते. त्या गाडीचे परमिट आणि चालकाचा मोबाईल जप्त करण्यात आला होता. मात्र या ट्रक कोणी आणल्या हे माहिती नाही? असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळे चार ट्रक ताब्यात असून दोन ट्रकवरच कारवाई का? असा प्रश्न उपस्थित होत होता. तर आम्ही दोनच ट्रकवर कारवाई केल्याचे अन्न औषध प्रशासन विभागाने सांगितले होते.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत नवा ट्विस्ट
आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. अतिरिक्त ज्या दोन ट्रक अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आवारात उभ्या होत्या त्या ट्रक लुटण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून या दोन ट्रक लूटण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र एकाच वेळी कारवाई आणि लुटण्याचा प्रयत्न कसा झाला? याबाबत मात्र संशय कायम आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.