श्री काळाराम मंदिरावर फडकला धर्मध्वज; माजी राष्ट्रपती कोविंद, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पूजन

श्री काळाराम मंदिर येथे बुधवारी पंचधातूच्या 21 फुटी स्तंभावर भव्य भगवा धर्मध्वज फडकवण्यात आला. हा धर्मध्वजारोहण सोहळा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

सिंहस्थ पुंभमेळ्यानिमित्त श्री काळाराम मंदिरावर अयोध्येच्या धर्तीवर 21 फुटी पंचधातूचा ध्वजदंड उभारण्यात आला. भगव्या ध्वजाचा आकार 11 बाय 5 फूट आहे, त्यावर ‘जय श्रीराम’, हनुमान प्रतिमा आणि सूर्यदेवाचे ओम चिन्ह आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून आकर्षक सजावटीने मंदिर व परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते. ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अयोध्या येथील श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजपूजन झाले, त्यानंतर तो फडकवण्यात आला.

श्रीरामपुंड येथे गोदावरी आरती

माजी राष्ट्रपती कोविंद यांनी सपत्नीक श्रीरामपुंड येथे सायंकाळी गोदावरी मातेची महाआरती केली. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिकच्या श्री काळाराम मंदिर येथे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते पूजा करून धर्मध्वज फडकवण्यात आला. सायंकाळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोदावरीची आरती केली.

नाशिकमध्ये तेरा हजार कोटींची गुंतवणूक – मुख्यमंत्री

तीनशेहून अधिक उद्योगांशी सामंजस्य करार होऊन नाशिक जिह्यात 13 हजार 190 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे, यातून नवे 32 हजार रोजगार उपलब्ध होतील, गुंतवणुकीच्या दृष्टीने आकर्षित करणारे महत्त्वाचे शहर अशी नाशिकची ओळख असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हॉटेल ताज येथे बुधवारी पुंभ उद्योग संगम व नाशिक जिल्हा गुंतवणूक शिखर परिषद पार पडली, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

Comments are closed.