कांदिवली शताब्दी सुपरस्पेशालिटी रुग्णालयात कर्करोगावर उपचार, 11 मजली प्रशस्त हॉस्पिटलमुळे 325 बेड वाढणार पश्चिम उपनगरासाठी मोठी सुविधा
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कांदिवली पश्चिम डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थात शताब्दी रुग्णालयाच्या नूतनीकरणामध्ये तब्बल 325 बेड वाढणार आहेत. या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये कर्करोग, हृदयरोग, मज्जातंतू, यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजारांवर अद्ययावत उपचार केले जाणार आहेत.
शताब्दी रुग्णालयात अद्ययावत आरोग्य सुविधा निर्माण केल्या जाणार असल्यामुळे विशेषतः पश्चिम उपनगरातील गोरगरीब रुग्णांना अद्ययावत उपचार मिळणार असून मुंबईतील मोठय़ा रुग्णालयांवर येणारा ताण कमी होणार आहे. या रुग्णालयाच्या बांधकामाची आणि रुग्णालयातील सेवासुविधांची आज अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी भेट घेऊन आढावा घेतला. या इमारतीच्या अकरा मजल्यांपैकी 9 मजले बांधकाम पूर्ण झाले आहे.
सद्यस्थितीत 444 बेड असलेल्या रुग्णालयाच्या विस्तारामुळे आणखी 325 बेड वाढणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. धर्मशाळेच्या इमारतीची क्षमता वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शताब्दी रुग्णालयाच्या माध्यमातून पश्चिम उपनगरातील साधारणपणे 30 लाख ते 40 लाख इतक्या लोकसंख्येसाठी या रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा देण्यात येते.
Comments are closed.