मुलींना आणि महिलांना न्याय देता येत नाही, राजकारणात येऊन कुठेतरी फसलो किंवा चुकलो : रोहित पवार

Rohit Pawar जळगाव : राज्यात लहान मुली आणि महिलांना न्याय देता येत नसल्याने राजकारणात येऊन कुठेतरी फसलो किंवा चुकलो असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी केले आहे. आम्ही राजकारणात आहोत, विरोधात आहोत मात्र लहान मुली आणि महिलांना आम्हाला न्याय देता येत नसल्याची खंत ही रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. रोहित पवार या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून भडगाव येथे तीन वर्षांपूर्वी अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार (Crime News) व हत्या झाल्याची घटना घडली होती. त्या पीडित कुटुंबीयांची रोहित पवार यांनी भेट घेतली. त्याप्रसंगी रोहित पवार त्यांनी पीडित कुटुंबीयांशी बोलताना ही खंत व्यक्त केली आहे.

Rohit Pawar : तीन वर्ष होऊन सुद्धा फास्टट्रॅक कोर्टमध्ये अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही

भडगावच्या गोंडगावआयध्ये 2023 साली घडलेली घटना अतिशय दुर्दैवी होती. संपूर्ण महाराष्ट्र पिढीतेच्या बाजूने उभा राहिला होता. सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून मारण्यात आलं होतं. ही घटना घडल्यानंतर त्यावेळेस फास्टट्रॅक न्यायालय लावण्यात आलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रात फास्टट्रॅक कोर्टची चर्चा आहे. पुण्यातल्या प्रकरणात देखील फास्टट्रॅक कोर्ट आहे. फास्टट्रॅक कोर्टचा फायदा होतो का हे जर बघायचं असेल तर गोंडगाव मधील घटना आपण बघितली पाहिजे. तीन वर्ष होऊन सुद्धा फास्टट्रॅक कोर्टमध्ये अजून पर्यंत न्याय मिळाला नाही. आज परिवाराला भीती वाटत आहे त्या मुलीला न्याय मिळेल का? कायदा खरच गरीबाच्या बाजूने आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मी सरकारला विनंती करेल 2019 मध्ये आणलेला शक्ती कायदा लागू करा, त्यात अजून काही गोष्टी कडक कराव्यात. त्या कायद्याच्या माध्यमातून लोकांना असं कृत्य करताना भीती वाटेल, लहान मुली आणि महिलांवर होणारे अत्याचार कुठेतरी कमी होतील. या प्रकरणांमध्ये कुठेही राजकारण न आणता परिवाराला न्याय मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

Rohit Pawar : उपमुख्यमंत्र्यांना या न्याय मिळवण्यासाठी अडचणी येत असतील मग गरिबाकडे कोण बघणार?

ज्याच्याकडे पैसा आहे ते आपल्या मुलींना सेक्युरिटी लावू शकतात. पण गरीबाचं काय? अजित दादांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. उपमुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्रात न्याय मिळवण्यासाठी अडचणी येत असतील मग गरिबाकडे कोण बघणार आहे. वर्षभरात पन्नास हजार पेक्षा जास्त गुन्हे महिलॅनबाबतीत महाराष्ट्रात दाखल झाले आहे. दिवसाला 137 गुन्हे, महाराष्ट्रात दिवसाला 24 बलात्कार होत आहे, तासाला एक बलात्कार होतो. वर्षभरात 13 हजार लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. अत्याचार करणाऱ्यांना भीती वाटत नाही का? त्यांना पोलिसांची भीती राहिली नाही का? पोलिसांना वेगळं काम दिले जात असल्याने या प्रकरणांकडे दुर्लक्ष होतं असं मला वाटतं, असेही रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar : गृह विभाग आणि सिस्टम कमी पडत आहे

एका मंत्राच्या OSD ने स्वतःच्या पत्नीला बॅटने मारलं. हा व्यक्तिगत विषय असला तरी बॅटने तुम्ही मारता का? मंत्र्याच्याच OSD ला असं वाटायला लागलंय की या शासनामध्ये महिलांचा अनादर केला तरी चालतो. सरकारला माझी विनंती गोंडगावच्या मुलीला लवकर न्याय मिळवून द्या, या प्रकरणात गावातील आठ मुलांवर जी उगाचच कारवाई झाली आहे ती मागे घेण्यात यावी. गृह विभाग आणि सिस्टम कमी पडत आहे. महिलांसंदर्भात घटना घडल्यानंतर शासनाने खपवून न घेतल्यास पोलिसांमध्ये विश्वास वाढेल. असेही रोहित पवार म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.