बंगालमध्ये शुभेंदू अधिकारींच्या पीएला गोळ्या घालून संपवलं, ममता बॅनर्जींच्या TMC ची प्रतिक्रिया

बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी पीए चंद्रनाथ रथ हत्या TMC प्रतिक्रिया: पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुकीत (West Bengal Legislative Assembly Elections) मोठा उलटफेर पाहायला मिळाला. पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा (Trinamool Congress Party) भाजपकडून (BJP) दारुण पराभव करण्यात आला. तेव्हापासून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार (Violence in West Bengal) सुरूच आहे. अशातच आता राज्यात रक्तरंजित संघर्षाला सुरुवात झाली आहे. बुधवारी (6 मे) भाजप नेते सुवेंदू अधिकारी (BJP Leader Suvendu Adhikari) यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बराच वेळ पाठलाग करुन हल्लेखोरांनी डोक्यात आणि छातीत गोळ्या घालून चंद्रनाथ रथ (Chandranath Rath) यांची हत्या केली. या घटनेदरम्यान, त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका व्यक्तीला गोळी लागल्याने दुखापत झाली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेवर ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) तृणमूल काँग्रेसनंही (TMC Party) प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणी तृणमूल काँग्रेसनं (TMC) सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

तृणमूल काँग्रेसकडून हत्येचा निषेध (TMC On Chandranath Rath Murder)

तृणमूल काँग्रेसनं ट्विटरवर एक पोस्ट करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ट्विटरवरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, “आज रात्री मध्यग्राम इथे घडलेल्या चंद्रनाथ रथ यांच्या क्रूर हत्येचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो…”

तृणमूल काँग्रेसनं या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आपल्या निवेदनात, पक्षानं ठामपणे म्हटलंय की, लोकशाहीमध्ये हिंसाचार आणि राजकीय हत्यांना कोणतंही स्थान नाही. त्यासोबतच निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात आपल्या पक्षाचेही अनेक कार्यकर्ते मारले गेल्याचा दावा टीएमसीनं केला आहे.

पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक (DGP) सिद्धनाथ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या घटनेत वापरलेलं वाहन जप्त केलं असून, घटनास्थळावरून जिवंत काडतुसे आणि रिकाम्या पुंगळ्या हस्तगत केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाच्या नंबर प्लेटमध्ये फेरफार करण्यात आली होती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

काय म्हणाल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार सयोनी घोष? (चंद्रनाथ रथ हत्या: सायोनी घोष)

तृणमूल काँग्रेसच्या खासदार सयोनी घोष (Saayoni Ghosh) यांनी ट्विटरवर एक ट्वीट केलं असून त्यांनी लिहिलंय की, “चंद्रनाथ रथ यांच्याशी संबंधित ही घटना अत्यंत चिंताजनक आहे. राजकीय आणि वैचारिक मतभेदांच्या पलीकडे जाऊन, आणि सत्तेवर कोणाचंही सरकार असलं तरीही, कायदा आणि सुव्यवस्था राखणं आणि या राज्यात वास्तव्यास असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेची खात्री करणं, हे आपल्या सर्वांचं सामूहिक कर्तव्य आहे…”

ट्वीटमध्ये पुढे त्यांनी लिहिलंय की, अशा प्रकारे कोणाचाही बळी जाता कामा नये. गेल्या काही दिवसांत घडलेल्या हिंसाचाराच्या कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक गुन्हेगारावर शक्य तितकी कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, असं आवाहन त्यांनी पोलीस प्रशासनाला केलंय.

नेमकं काय घडलं?

मध्यमग्राम परिसरातील जेस्सोर रोडजवळ, बुधवारी रात्री उशिरा (6 मे 2026) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रनाथ रथ हे एका कारमधून प्रवास करत असताना, दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली आणि अगदी जवळून त्यांच्यावर गोळीबार केला. अत्यंत गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर, भाजप नेत्यांनी या हल्ल्याचे वर्णन ‘लक्ष्यित हल्ला’ (targeted attack) असे केले आहे. भाजप नेते सुजय कुमार डे यांनी सांगितले की, या हल्ल्यात चार ते पाच दुचाकींचा वापर करण्यात आला होता आणि हल्लेखोर केवळ चंद्रनाथ रथ यांनाच लक्ष्य करण्याच्या उद्देशाने आले होते. त्यांनी असेही नमूद केले की, कारमध्ये चालकही उपस्थित होता, तरीही केवळ चंद्रनाथ रथ यांच्यावरच गोळीबार करण्यात आला. भाजप नेत्या किया घोष यांनीही असा आरोप केला की, हा हल्ला राजकीय वैमनस्य आणि सूडबुद्धीने प्रेरित होऊन करण्यात आला होता.

आणखी वाचा

Comments are closed.