शिवसेनेसह भाजपच्या बड्या नेत्यांचे अतोनात प्रयत्न, पण गोकुळ गीतेंनी शेवटपर्यंत माघार घेतलीच नाह

नाशिक विधान परिषद निवडणूक 2026: राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election 2026) रणधुमाळी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीला (Mahayuti) मोठा हादरा बसला असून, बंडखोरीचे (Rebellion) वादळ शमवण्यात नेत्यांना अपयश आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अधिकृत वेळ आता संपली असून, भाजप व शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी आटोकाट प्रयत्न करूनही अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे आता नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) विरुद्ध अपक्ष उमेदवार गोकुळ गीते अशी हायव्होल्टेज आणि लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Nashik Vidhan Parishad Election 2026: शेवटच्या क्षणापर्यंत ड्रामा; गोकुळ गीते आलेच नाहीत

आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड ‘हायव्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळाला. मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात फोनवरून सातत्याने चर्चा सुरू होती. गोकुळ गीते हे माघारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत आहेत, असा निरोप नेत्यांना देण्यात आला होता; मात्र अंतिम मुदत संपली तरी गोकुळ गीते फिरकलेच नाहीत.

या नाट्यमय घडामोडींदरम्यान, निलेश बोरा यांनी मंत्री उदय सामंत यांना आश्वासन दिले की, “जरी गोकुळ गीते यांनी अर्ज मागे घेतला नसला, तरी गिरीश महाजन (Girish Mahajan) स्वतः या विषयात लक्ष घालणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या जागेसंदर्भात महायुतीला कोणतीही अडचण येणार नाही. आपण गोकुळ गीते यांचा जाहीर पाठिंबा मिळवून घेऊ.”

Ganesh Gite: गणेश गीतेंची माघार; फडणवीस-महाजनांना दिलेला शब्द पाळला

दुसरीकडे, गोकुळ गीते यांचे बंधू आणि माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते (Ganesh Gite) यांनी मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहत स्वतःचा अर्ज मागे घेतला. प्रसारमाध्यमांशी बोलताना गणेश गीते म्हणाले, “आम्ही पक्षाशी प्रामाणिक आहोत. आम्ही जो शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना दिला होता, तो शब्द आम्ही पूर्ण केला आहे.” गणेश गीते यांनी कार्यालयात उपस्थित असताना त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने गोकुळ गीते यांची फोनवर मनधरणी करण्याचा शेवटचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला यश आले नाही.

Gokul Gite: धमकीमुळे गोकुळ गीते बंडखोरीवर ठाम

दरम्यान, कुणाल दराडे यांनी फोनवरून गोकुळ गीते यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप गोकुळ गीते यांनी केला. कुणाल दराडे यांनी आमचा बाप काढल्यामुळे नाराज आहोत. अशा प्रकारे धमकी दिल्याने मी आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, अशी बतावणी करत गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत.

Nashik Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांचे फोनही ठरले निष्फळ

बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या 14 मिनिटांत राज्याच्या वरिष्ठ पातळीवरून वेगाने चक्रे फिरली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी थेट निलेश बोरा यांना फोन लावून परिस्थितीचा आढावा घेतला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनीही गणेश गीते यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. मात्र, शेवटपर्यंत गोकुळ गीते ठाम राहिले.

Nashik Vidhan Parishad Election 2026: महायुतीची डोकेदुखी वाढली

मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीमुळे गणेश गीते बाजूला झाले असले, तरी त्यांचे बंधू गोकुळ गीते निवडणूक रिंगणात कायम राहिल्याने शिवसेना-भाजप युतीची कोंडी झाली आहे. गोकुळ गीते यांना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि इतर स्थानिक विरोधकांनी आधीच छुपा पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे आता दराडे विरुद्ध गीते या थेट लढतीत नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)

निवडणुकीची अधिसूचना- 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून

उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून

अर्ज माघारीची मुदत- 4 जून

मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)

मतमोजणी- 22 जून

आणखी वाचा

Nashik Vidhan Parishad Election 2026: ‘आमचा बाप काढला, कुणाल दराडेंकडून शिवीगाळ’; गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम; नाशिकमध्ये अखेरच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा!

आणखी वाचा

Comments are closed.