आमदार साहेब, तुमची बहीण मारली! नाशकात प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली उडी मारत संपवलं जीवन; चिठ्ठीत 1
नाशिक बातम्या: विवाहबाह्य प्रेमसंबंधांबद्दल वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून महिला आणि तिच्या प्रियकराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या (Nashik) नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील नस्तनपूर शनिदेव मंदिराजवळ घडली. आत्महत्या करण्यापूर्वी या प्रेमी युगालाने भावनिक सुसाईट नोट लिहिली असून, त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली 16 जणांविरुद्ध नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनमाडजवळच्या वंजारवाडी गावात राहणाऱ्या उज्ज्वला रामकृष्ण खताळ गावातील ज्ञानेश्वर माधव पवार यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, नातेवाईक गावातील काही लोकांचा त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यातून ‘आत्महत्या करा,अन्यथा ठार मारू’,अशी आमच्या मागे आमदार व माजी आमदार संजय पवार व अधिकारी असल्याच्या धमक्या वारंवार दिल्याने त्या मानसिक छळाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. आमदार साहेब तुमची बहीण मारली या लोकांनी, याची सखोल चौकशी करावी, अशी भावनिक साद देखील या सुसाईट नोटमध्ये प्रेमीयुगलाने घातली आहे.
नेमकं प्रकरण काय?
फिर्यादी गोविंद नवनाथ मिटके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची बहीण उज्ज्वला रामकृष्ण खताळ (रा. वंजारवाडी, ता. नांदगाव) हिचे तिच्या गावातील ज्ञानेश्वर माधव पवार याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गावातील काही लोकांनी त्यांच्या नात्याला विरोध करत त्यांना वारंवार ‘आत्महत्या करा’ अन्यथा ठार मारू अशी धमकी दिल्याने त्या मानसिक छळाला कंटाळून दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, उज्ज्वलाने तिच्या भावाला दि. 11 मार्च 2025 रोजी रात्री 8.50 वाजता व्हॉट्सॲपवर एक चिठ्ठी पाठवली होती. त्यात तिने आत्महत्येस जबाबदार असलेल्या 16 जणांची नावे नमूद केली होती. त्या चिठ्ठीमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, या व्यक्तींनी तिला आणि तिच्या प्रियकराला धमकावत, त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
‘हे’ आहेत संशयित
अरुण /मधुकर रामा गायकवाड, संदिप वाल्मिक सावंत, प्रकाश वाल्मिक सावंत, नवनाथ मारुती जाधव, संतोष माधव पवार, अनिल राधु दखने, संजय मारुती सोनवणे, रोहिदास मारुती सोनवणे, सोपान सुर्यभान गुंडगळ, सुनिता ज्ञानेश्वर पवार, सोनल संतोष पवार, जन्याबाई छबु गुंडगळ, नितीन सुभाष घाडगे (रा. मनमाड), सतिष/बाल्या दत्तू जाधव, बाळु सटवा गोसावी, छगन दादा साठे या सोळा जणांविरुद्ध नांदगाव पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींवर देखील चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.