नसरापूर प्रकरणी भीमराव कांबळे दोषी, 29 जूनला शिक्षेवर होणार फैसला
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी 65 वर्षीय आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. भीमराव कांबळेवरील सर्व आरोप सिद्ध झाले असून त्याला 29 जूनला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
नसरापूर येथे 1 मे रोजी साडे तीन वर्षाच्या चिमुरडीवर भीमराव कांबळे यांने पाशवी अत्याचार करून तिचा खून केला होता. या हृदयद्रावक घटनेनंतर पोलिसांनी तत्परता दाखवत भीमराव कांबळे याला अटक केली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत जलदगतीने तपास चक्र फिरवली आणि न्यायालयात 1 हजार 100 पानांचे सविस्तर दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची नियमित आणि वेगवान सुनावणी पार पडली. विशेष म्हणजे, सरकारी पक्षाच्या वतीने अवघ्या 16 दिवसांच्या कालावधीत एकूण 55 महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. या भक्कम साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने नराधम भीमराव कांबळेला दोषी ठरवले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 जूनला होणार आहे.
Comments are closed.