जगभरात पाकिस्तानला हास्यास्पद बनवले आहे; मोहसिन नक्वी आणि PCB वर नासिर हुसेनचा निशाणा
पाकिस्तान क्रिकेट संघावर सध्या सर्वत्र टीका होत आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि समालोचक नासिर हुसेन यांनीही पीसीबीवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) त्यांच्या संघाला हास्यास्पद बनवले आहे.
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाने हेडिंग्ले आणि लॉर्ड्स येथे दोन कसोटी सामने गमावले. ०-२ ने पिछाडीवर असलेला हा संघ आता ९ सप्टेंबर रोजी एडजबॅस्टन येथे खेळेल.त्याबाबत इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनीही पीसीबी आणि त्याचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या निर्णयांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नासिर हुसेन यांनी स्पष्टपणे सांगितले की, इंग्लंडविरुद्धच्या पाकिस्तानच्या खराब कामगिरीमुळे ते आधीच निराश होते, परंतु पीसीबीने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटच्या अडचणी कमी होण्याऐवजी त्या अधिकच वाढल्या.संघाच्या सध्याच्या स्थितीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जबाबदार आहे, असे ते म्हणाले.
हेडिंग्ले आणि लॉर्ड्स कसोटीतील पराभवानंतर, पीसीबीने इंग्लंड दौऱ्यावरून सात खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद रिझवान, सलमान अली आगा आणि इमाम-उल-हक यांसारख्या खेळाडूंना संघातून वगळण्यात आले. इतकेच नाही तर, बर्मिंगहॅममधील तिसऱ्या कसोटीसाठी कसोटी प्रशिक्षक सरफराज अहमद यांच्या जागी माईक हेसन यांची नियुक्ती करण्यात आली.
पीसीबीच्या या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नासिर हुसेन म्हणाले की, पाकिस्तानची परिस्थिती आधीच वाईट होती, पण त्यावेळी लोक त्यांची खिल्ली उडवत नव्हते. स्काय स्पोर्ट्स क्रिकेट पॉडकास्टवर बोलताना हुसेन म्हणाले की,”हेडिंग्ले सामन्यानंतर जग पाकिस्तानवर हसत होते, त्यांनी पाकिस्तानला हास्यास्पद बनवले आहे.
असे मला वाटत नाही.”
पीसीबीच्या अलीकडील निर्णयांनी संपूर्ण परिस्थिती बदलली आहे.पीसीबीने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली, त्यामुळे हे सर्व घडले. एवढा महान क्रिकेट खेळणारा देश आजच्या स्थितीत पोहोचला आहे. त्यांनी आता जे केले आहे, त्यामुळे पाकिस्तान हास्यास्पद ठरला आहे. त्यांनी परिस्थिती आणखी बिघडवली आहे.”
Comments are closed.