नथुराम गोडसे हा नीच आणि नालायक ब्राह्मण होता; श्रीपाल सबनीसांचं स्फोटक वक्तव्य

अकोला: अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या ब्राम्हण समाजावरील वक्तव्यावरून राज्यात वाद पेटण्याची चिन्ह आहेत. नथुराम गोडसे (Nathuram Godse) हा नीच आणि नालायक ब्राह्मण होता. त्यानेच महात्मा गांधीजींना (Mahatma Gandhi) ठार केले. यासोबतच देशातील चातुर्वण्य व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण (Brahmin) आहेत.  ही सर्व वर्ण व्यवस्था दिसत असताना त्याला कट्टर विरोध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. माझ्या पूर्वजांनी केलेल्या चुकांबद्दल आपण माफी मागत असल्याचं डॉ. सबनीस (Shreepal Sabnis) यांनी म्हटले. ते अकोला जिल्ह्यातील अकोट येथील श्री. शिवाजी महाविद्यालयात आयोजित डॉ. विलास तायडे लिखीत ‘वाड्:मय विलास गौरवग्रंथ’ आणि ‘बैलबंडी ते हवाई दिंडी’ या दोन पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

नथुराम गोडसे हा नीच ब्राह्मण आणि नालायक ब्राह्मण होता. महात्मा गांधींना त्याने ठार मारलं. आताचे हिंदुत्ववादी (Hindutva) त्या नथुरामचे पुतळे उभारत आहेत. हे धर्मकारण नव्हे, तर हे धर्माची मग्रुरी आहे. अशा धर्मापासून देशाचं संरक्षण करण्याची गरज आहे, असे मत श्रीपाल सबनीस यांनी मांडले.

दरम्यान, डॉ. श्रीपाल सबनीस यांनी देशातील मतदार, मंत्री, आमदार आणि सरपंच विकाऊ असल्याचा आरोप केला. पाच कोटीला एक आमदार (MLA) विकला जात आहे. या देशातील जनता दोन हजाराच्या नोटेला आपलं मत विकत आहे. ज्या देशातील जनता लोकशाही विकायला काढते त्या देशाचे भवितव्य काय?, असा सवाल श्रीपाल सबनीस यांना उपस्थित केला.

विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात विद्रोही साहित्य संमेलनात ठराव मंजूर करण्यात आला.  मराठवाड्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोहोचलेले गुन्हेगार यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी .चौकशी नि:पक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावे असा ठराव नाव न घेता संमत करण्यात आला.

https://www.youtube.com/watch?v=LCQFVFZ097K

आणखी वाचा

ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही, जिथे जाऊ तिथे आपलं स्थान निर्माण करू : माधव भंडारी

मोठी बातमी ! ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळास कॅबिनेटची मंजुरी

Neelam Gorhe On Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं; नीलम गोऱ्हेंच्या विधानाने खळबळ, दानवे म्हणाले, ही नमकहरामी…

अधिक पाहा..

Comments are closed.