राज्यात निवडणूकीच्या धामधूमीत नवीन पक्षाची एंट्री; नॅशनल पीपल्स पार्टी निवडणुकीच्या रिंगणात
महाराष्ट्राचे राजकारण : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची धामधूम सुरु असताना राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडलीय. राज्यातील राजकारणात आता नवीन पक्षाची एंट्री झालीय, तो म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी (National Peoples Party). ईशान्य भारतातील मेघालय राज्यात 2013 साली लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांनी या नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) या पक्षाची स्थापना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शरद पवार यांच्याशी मतभेद झाल्यावर केली. भारतातील आदिवासी आणि स्थानिक समाजाच्या हक्कांसाठी काम करणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे.
National Peoples Party : 2023 मध्ये मेघालय विधानसभेत्यामुळे सर्वात मोठा पक्ष
दरम्यान2023 मध्ये मेघालय विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात हा सर्वात मोठा पक्ष ठरला आणि नॅशनल पीपल्स पार्टीला 2023 मध्ये राष्ट्रीय पक्षाचीही मान्यता मिळाली. प्रादेशिक असला तरी सध्या हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. मेघालयसह मणिपूर, नागालँड, झारखंड, आसाम या राज्यांमध्ये या पक्षाचा दबदबा आहे व सध्याही मेघालयमध्ये एनपीपी या पक्षाचे कोरांड संगमा हे मुख्यमंत्री आहेत. या पक्षाने एनडीए सोबत काही राज्यात युती केली आहे. मात्र आता या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केलीय.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी अमित वेळूकर यांची नियुक्ती
नुकतच दिल्ली येथे मेघालयचे मुख्यमंत्री कोराड संगमा यांनी महाराष्ट्रात या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पदी अमित वेळूकर यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे एनपीपी या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित वेळूकर हे बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद निवडणुकीत एनपीपी पक्ष आदिवासी भागात आपले उमेदवार देणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात या पक्षाने एन्ट्री केली आहे. राज्यात हा पक्ष कोणत्या भागात कशी काम करणार? पक्षाचा विस्तार कसा करणार? पक्षाचे ध्येय धोरणासंबंधी NPP चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमित वेळूकर यांच्यावर या साऱ्याची जबाबदारी असणार आहे.
दरम्यान, 4 नोव्हेंबरला राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रराजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षांचे नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.अशातच राज्यातील राजकारणात आता नॅशनल पीपल्स पार्टी (National Peoples Party) या नवीन पक्षाची एंट्री झालीय. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक या पक्षावर कितपत विश्वास ठेवत संधी देणे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.