नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना मिळणार 45 हजारांचा बोनस, महासभेत प्रस्ताव मंजूर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवी मुंबई महापालिकेतील सर्वच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी प्रत्येकी 45 हजार सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव आज महासभेत मंजूर झाला. त्यामुळे इतक्या मोठ्या रकमेचे सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे सर्व कर्मचाऱ्यांनी जोरदार स्वागत केले असले तरी सफाई कामगार मात्र या बोनसपासून दूर राहिले आहेत. त्यांना पूर्वीच्या नियमानुसारच बोनस दिला जाणार आहे.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कोणताही भेदभाव न करता सर्वच कायम, ठोक मानधनावरील, ठेकेदारी पद्धतीने, शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी 45 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी सभागृह नेते यांनी आज महासभेच्या पटलावर प्रस्ताव ठेवला. आज हा प्रस्ताव महापौर सुजाता पाटील यांनी चर्चेसाठी सभागृहात ठेवला. या प्रस्तावावर झालेल्या चर्चेत अनेक नगरसेवकांनी सहभाग घेतला. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा अधिकार हा महासभेचा आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे 23 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे, असे यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी नमूद केले.

राज्यात सर्वाधिक बोनस देणारी पालिका

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या घरी दिवाळी सारखीच साजरी होते. त्यामुळे सर्वांना कोणताही भेदभाव न करता सारखाच बोनस देण्याचा संकल्प होता. त्यानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यामुळे इतक्या मोठ्या रकमेचा बोनस देणारी नवी मुंबई महापालिका ही राज्यातील पहिली पालिका ठरली आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी सभागृह नेते सागर नाईक यांनी व्यक्त केली.

Comments are closed.