तोड्या करण्यासाठी दोन भाऊ एकत्र, ठाकरे परिवार हे मजबूरीचे नाव; नवनीत राणांची राज ठाकरे अन् उद्ध
नवनीत राणा राज-उद्धव ठाकरेंवर अमरावती: अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी आपल्या राहत्या घरासमोर अंध, अपंग, कृष्ठरोगी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दूरध्वनीच्या माध्यमातून उपस्थिताना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन राणा दाम्पत्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. यावेळी आपल्या भाषणात नवनीत राणा यांनी बच्चू कडूंवर (Bacchu Kadu) जोरदार टीका केली. तसेच नवनीत राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला.
नवनीत राणा बच्चू कडूंना काय म्हणाल्या? (बच्चू कडू यांच्यावर नवनीत राणा)
बरेच नौटंकी लोक आहेत जे आज बाहेर फिरून सांगत आहेत आमदारांना मारून टाका… तुम्ही चार वेळा आमदार होते दोन वेळा मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली, असा हल्लाबोल नवनीत राणांनी केला.
नवनीत राणांची ठाकरे बंधुर टिका- (नवनीत राणा राज-उद्धव शॉकरेवर)
परिवार एकत्र येणं ही आपली संस्कृती आहे आणि आपण ती जपली पाहिजे… पण आज संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे दोन भाऊ एकत्र आले ते फक्त सत्ता आणि खुर्चीसाठी…सत्तेत आल्यानंतर फक्त पैशासाठी आणि तोड्या करण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले आहेत. ठाकरे परिवार हे मजबूरीचे नाव झालेले आहे, असा निशाणा नवनीत राणांनी ठाकरे बंधूंवर साधला.
अचलपूरचे माजी आमदारांकडे करोडोंची संपत्ती- (Amravati Politics)
आज अनेक लोक आजीचे माजी झाले कारण त्यांनी कधी खिशात हातच टाकला नाही. फक्त इनकमिंग आउटगोइंग नाही. अचलपूरचे माजी आमदार त्यांच्याकडे करोडोची संपत्ती आहे. मी दहा वेळा म्हटलं तुमची संपत्ती मला द्या माझी संपत्ती तुम्ही घ्या…शेतकऱ्याच्या एका मुलाने त्यांना पाडलं कारण शेतकरी दुःखी होता, अशी टीका नवनीत राणांनी केली.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
आणखी वाचा
Comments are closed.