नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांसमोरच ‘मी पुन्हा येईन’ म्हणत खासदार होण्याची व्यक्त केली इच्छा; देव


राणा आणि देवेद्र फडणवीस: अमरावतीच्या (Amravati) धारणी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील चोथमल आणि धारणीमधील भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार सभेत माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मी पुन्हा येईन, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली. तर आमची माजी खासदार आता तुमच्या आशीर्वादाने माजी खासदार राहणार नाही, असे म्हणत नवनीत राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिलाय. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दादा आता मलाही म्हणायची वेळ आली आहे की, मी पुन्हा येईन, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच नवनीत राणा यांनी पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली. टी को लाना है वापस की नही लाना है, दादा पराभव झाल्यानंतरही आम्ही खूप कष्ट करून इथपर्यंत प्रचारासाठी आलो. देवेंद्र भाऊ, देवा भाऊ म्हणून तुम्ही महिलांच्या पाठीशी आहात. त्यांच्या डोक्यावर तुमचा हात आहे, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले आहे.

Devendra Fadnavis on Navneet Rana: नवनीत राणा आता माजी खासदार राहणार नाही: देवेंद्र फडणवीस

तर नवनीत राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुजोरा दिल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमच्या आशीर्वादाने नवनीत राणा आता माजी खासदार राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की,  महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या धारणीत मी आलो आहे. मी म्हटले की मला धारणीत सभा करायची आहे. मी धारणीमधून सर्व अमरावती जिल्ह्याला सांगायला आलो की, भाजपला ही निवडणूक द्या. या लोकांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे. धारणीमधील 52 कोटीची योजना असेल किंवा चिखलदरामध्ये 55 कोटीची पाण्याची योजना मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारने दिली. घराघरात आम्ही पाणी पोहचवणार आहोत. प्रत्येक शहारात आम्ही बंद गटार लाईन टाकणार आहोत. ते पाणी नदीत जाणार नाही. त्यावर आम्ही प्रक्रिया करू, असे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis: आम्ही आश्वासन पूर्ण करत असतो

देवेंद्र फडणवीस भाषणात पुढे म्हणाले की, असे लोक निवडायचे आहे ते आपल्या अजेंड्यावर काम करतील. मोदी यांच्या अजेंड्यावर काम करतील. 1300 आजारासाठी आधी उपचार होत होते आता 2400 आजारवर उपचार 5 लाखांमध्ये केले जाणार आहेत. हा खर्च भाजप सरकार करेल. धारणीमधील 50 बेडचे उपजिल्हा रुग्णालय आता 100 बेडचे करण्याचा आम्ही निर्णय केला आहे. लोक वेगवेगळे आश्वासन देत असतात. आम्ही आश्वासन पूर्ण करत असतो. विरोधक आरोप करत होते की, लाडकी बहीण योजना बंद होणार. पण आम्ही बंद केली नाही. जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे येत राहणार आहे. आम्ही एकदा येऊन पळून जाणारे लोक नाही, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

Maharashtra Local Body Election 2025: 40 नगरपरिषदांमध्ये आरक्षणाच्या 50 टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन, निवडणुकांवर टांगती तलवार, पाहा संपूर्ण यादी!

आणखी वाचा

Comments are closed.