एका जिल्ह्यातील प्रकारामुळे पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही : नवाब मलिक
शिर्डी : राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभरात पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होत आहे. परिणामी, आगामी निवडणुकांसाठी आशा प्रकारची बदनामी होणे हे पक्ष हिताचं नाही. त्यामुळे या प्रकरणी लवकरात लवकर पक्ष नेतृत्व यांनी पक्षाच्या हिताचा विचार करत निर्णय घ्यायला हवा, असा सल्ला देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते नवाब मलिक यांनी बीड प्रकरणावर भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन दिवसांचे ‘नवसंकल्प शिबिर’, शनिवारपासून शिर्डी येथे सुरू झाले आहे. यासाठी राज्यातील पक्ष, आघाडी आणि विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत. यावेळी बोलताना पक्षाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्याकडून बीड प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला. एकीकडे राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. तर या संतापाचा फटका मंत्री धनंजय मुंडे यांनाही बसला असून विरोधकांसह मित्र पक्षातील नेत्याकडून ही मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका केली जात आहे. एकंदरीत बीडच्या या प्रकरणामुळे पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी होत असल्याचा ठपका ठेवत नवाब मलिकांनी एकप्रकारे पक्षाला घरचा आहेरच दिला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पक्षातील जेष्ठ नेत्याचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार मान्य करतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
धनंजय मुंडे दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या शिबिरासाठी शिर्डीत दाखल
राज्यात पार पडलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे साऱ्यांना वेध लागले आहे. अशातच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे शनिवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) अधिवेशन पार पडत आहे. दरम्यान या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे जणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाने काल (शनिवारी) दिली होती. त्यांच्या अनुपस्थितीने वेगवेगळ्या चर्चा ही रंगल्या होत्या. कारण सध्या राजकीय वर्तुळात सुरू असलेले आरोप प्रत्यारोप, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची जवळीक यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होत होती. त्यामुळे या शिबिराला मुंडेंनी पाठ दाखवल्याचं बोललं जात होतं. मात्र, आज ते शिबीरासाठी उपस्थित झाले असून त्यांनी आज शिर्डी येथे साई बाबांचे दर्शन घेत या अधिवेशनाला हजेरी लावली आहे.
बीडचा बिहार झाला, पण तो कोणी केला?- धनंजय मुंडे
यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मला टार्गेट करण्यासाठी काही लोक आरोप करत आहेत. फक्त बीड नाही तर अख्खा मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडला आहे. आम्ही शिव-शाहू-फुले यांच्या विचाराचे आहात का? असे प्रश्न आम्हाला विचारले जातात. मात्र आपला एकमेव पक्ष आहे जो शिव-शाहू-फुलेंच्या विचाराने चालतो. बीड जिल्ह्यात आमचे सरपंच देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. त्याचं समर्थन कोणीच करु शकत नाही. ज्यांनी केलं त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे. त्या ५-८ गुन्हेगारांमुळे मिडिया ट्रायल होत आहे. बीडचा बिहार झाला, पण तो कोणी केला? 12 ज्योतिर्लिंगेपैकी परळी एक आहे. पण एका गावाला आणि एका जिल्ह्याला बदनाम केल जातंय. असा आरोप ही यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.