लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप,

NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप (Mangesh Jagtap Baramati) यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे (NCP Bhagyashree Dhaygude) यांनी हा गंभीर आरोप केला आहे. भाग्यश्री धायगुडे यांनी पुणे जिल्हा परिषदेत येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. त्यानंतर राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांनी भाग्यश्री धायगुडे यांना एम्ब्युलन्समधुन रुग्णालयात घेऊन गेल्या. या प्रकारानंतर मंगेश जगताप जिल्हा परिषदेतून निघून गेले. या प्रकरणातील आरोप संबंधित तरुणीने केले असून, त्याबाबत अधिकृत चौकशी सुरू आहे. संबंधित व्यक्तीची बाजू समोर येणे अद्याप बाकी आहे.

नेमकं काय घडलं? (NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati)

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान 27 जुलैला एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून, बारामतीमधील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांनी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत एका तरुणीने भरसभेत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला, ज्यामध्ये उपस्थित पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे पीडितेचे आरोप- (NCP Mangesh Jagtap Baramati News)

पुणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना आणि विविध मुद्द्यांवर चर्चा रंगलेली असतानाच या पीडित तरुणीने अचानक सभागृहात प्रवेश केला आणि सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले, ज्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. मात्र, तेथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षारक्षकांनी तात्काळ धाव घेत तरुणीला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. पीडित तरुणीने बारामतीमधील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करताना, जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचा दावा केला असून, वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने आणि प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने अखेर उद्विग्न होऊन हे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

मी दिसली की पळून जातो, पीडित तरुणीचा आरोप- (NCP Bhagyashree Dhaygude Allegations)

मंगेश जगताप यांचे संपू्र्ण कुटुंब यामध्ये सामील आहे. त्यांची मेव्हणी पोलीस आहे. दोन मित्र अमर अशोक जगताप, रणजीत तांबडे… या सगळ्यांना हा प्रकार माहिती आहे. गेले तीन महिने झाले, मी वाट बघतेय. तीन महिने झाले तो गायब आहे. मी दिसली की पळून जातोय. मला एकच प्रश्न आहे…मुलगा असता तर तुम्ही हिंदू-मुस्लिम करुन सगळं केलं असतं. आमचं लग्न ठरलेलं. आम्ही महाबळेश्वरमध्ये रिसॉर्ट बुक केलेले. 29-30 तारीख काढलेली…सगळे माझ्याकडे पुरावे आहेत, असं पीडित तरुणी म्हणाली. कॉलेजपासून आमचं प्रेमप्रकरण होतं. मात्र खोटं बोलून त्यानं लग्न केलं. मला समजताच मी घटस्फोट घेतोय, असं म्हणत सगळी कागदपत्रं दाखवली. परंतु ही घटस्फोटाची कागदपत्रंच खोटी निघाली, असा आरोप पीडितेने केला आहे. तसेच 21 वर्षे माझ्या आयुष्याशी का खेळला?, असा सवालही पीडितेने विचारला.

ही बातमीही वाचा:

Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!

Comments are closed.