रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो…; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादी

NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे (NCP Bhagyashree Dhaygude) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप (Mangesh Jagtap Baramati) यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्षे फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी 27 जुलै रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भाग्यश्री धायगुडे यांनी दावा केला आहे की, कॉलेजपासून दोघांचे प्रेमसंबंध होते आणि मंगेश जगताप यांनी लग्नाचे आश्वासन देत अनेक वर्षे प्रेमसंबंध कायम ठेवले. नंतर त्यांनी दुसरे लग्न केल्याचे समोर आले. घटस्फोट घेणार असल्याचे सांगून काही कागदपत्रेही दाखवली, मात्र ती बनावट असल्याचा आरोप धायगुडे यांनी केला आहे. तसेच, या प्रकरणात संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही माहिती असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या सर्व आरोपांची अधिकृत चौकशी सुरू असून, मंगेश जगताप यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. (Pune Zilla Parishad)

पीडितेने काय केले आरोप? (राष्ट्रवादी भाग्यश्री धायगुडे यांचा मंगेश जगताप बारामतीवर आरोप)

मंगेश जगताप यांचे संपू्र्ण कुटुंब यामध्ये सामील आहे. त्यांची मेव्हणी पोलीस आहे. दोन मित्र अमर अशोक जगताप, रणजीत तांबडे… या सगळ्यांना हा प्रकार माहिती आहे. गेले तीन महिने झाले, मी वाट बघतेय. तीन महिने झाले तो गायब आहे. मी दिसली की पळून जातोय. मला एकच प्रश्न आहे…मुलगा असता तर तुम्ही हिंदू-मुस्लिम करुन सगळं केलं असतं. आमचं लग्न ठरलेलं. आम्ही महाबळेश्वरमध्ये रिसॉर्ट बूक केलेले. 29-30 तारीख काढलेली…सगळे माझ्याकडे पुरावे आहेत, असं पीडित तरुणी म्हणाली. कॉलेजपासून आमचं प्रेमप्रकरण होतं. मात्र खोटं बोलून त्यानं लग्न केलं. मला समजताच मी घटस्फोट घेतोय, असं म्हणत सगळी कागदपत्रं दाखवली. परंतु ही घटस्फोटाची कागदपत्रंच खोटी निघाली, असा आरोप पीडितेने केला आहे. तसेच 21 वर्षे माझ्या आयुष्याशी का खेळला?, असा सवालही पीडितेने विचारला.

पीडिता पेट्रोल घेऊन पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घुसली, पुढे काय घडलं? (Mangesh Jagtap Baramati Marathi News)

पुणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना आणि विविध मुद्द्यांवर चर्चा रंगलेली असतानाच या पीडित तरुणीने अचानक सभागृहात प्रवेश केला आणि सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले, ज्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. मात्र, तेथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षारक्षकांनी तात्काळ धाव घेत तरुणीला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. पीडित तरुणीने बारामतीमधील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करताना, जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचा दावा केला असून, वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने आणि प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने अखेर उद्विग्न होऊन हे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातमी:

NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?

Comments are closed.