राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘कणा’च नव्या संविधानातून गायब?, ओबीसी अन् अल्पसंख्याक सेल वगळल्याने खळबळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील संविधानात राष्ट्रीय अध्यक्षाचे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांना मिळण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आरोप केलेल्या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील संविधानात आणखी काही बदल केल्याची बाब समोर आली आहे. पक्षाचा कणा असणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल नवीन संविधानातून काढून टाकण्यात आले आहेत. एकत्रित राष्ट्रवादीच्या संविधानात एकूण ७ फ्रंटल सेल नमूद करण्यात आल्याचं समोर आलं आहे. (NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)  पक्षाच्या नव्या संविधानात केवळ युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवादल या सेलचा समावेश असल्याचं उघड झालं आहे. २८ फेब्रुवारीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडी दरम्यान पक्षाकडून निवडणूक आयोगाला जे मिनिट्स पाठवण्यात आले त्यात संविधानात बदल करण्यात आला असल्याचं निदर्शनास आलं आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडून नुकतच निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं होतं, त्यात पक्षाकडून करण्यात आलेला पत्र व्यवहार रद्द करण्यात यावा अस नमूद करण्यात आलं होतं. हा मुद्दा रोहित पवारांनी माध्यमांसमोर मांडला होता. तर रोहित पवारांनी (Rohit Pawar)  प्रफुल पटेल (Praful Patel)  आणि सुनील तटकरेंवर (Sunil Tatkare) गंभीर आरोप केले होते.

नेमक काय प्रकरण?

अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना न सांगता निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. १६ फेब्रुवारी रोजी प्रफुल्ल पटेल (Praful Patel) , सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सह्यांचे एक पत्र आयोगाला देण्यात आले. त्यात अध्यक्षांच्या निधनामुळे कार्याध्यक्षांकडे म्हणजे पटेल यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार असल्याचे कळवण्यात आले होते. असा दावा रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला.

तर अजित पवार यांचे निधन झाले त्या २८ जानेवारीपासून ते १० मार्च २०२६ पर्यंतच्या कालावधीत पक्षाच्या वतीने इतर कुणी निवडणूक आयोगाकडे केलेला पत्रव्यवहार अमान्य करावा, असे पत्र अजित पवार (NCP) गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.