शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा, नाना पटोले दिल्लीला, राष्ट्रवादी काँग्रेसची पहि

राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विलिनीकरणासंदर्भातील कोणताही प्रस्ताव काँग्रेस पक्षाला देण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी दिले आहे. काँग्रेसकडून (Congress) देखील तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे शशिकांत शिंदे यांनी एबीपी माझाला फोनवरुन सांगितले.  प्रस्ताव जर आला असता तर नक्कीच वरिष्ठ नेतृत्वाकडून आम्हाला त्याबाबत कल्पना देण्यात आली असती, असेही शशिकांत शिंदे यांनी म्हटले. (Maharashtra Politics news)

काल सकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्वर ओक या निवासस्थानी पक्षाची बैठक झाली. या बैठकीमध्येसुद्धा काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर शरद पवार यांची आमच्यासोबत चर्चा नाही. अशा प्रस्तावाच्या संदर्भात माझ्यापर्यंत अशी कोणतीही माहिती आलेली नाही. त्यामुळे समोर आलेल्या बातमीमध्ये तथ्य नाही, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु आहे. सर्वच डाव्या विचारांच्या पक्षांनी संविधान वाचवण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे. त्याबाबत कोणाचंही दुमत नाही. पण काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला विलिनिकरणाचा प्रस्ताव दिला आहे, अशी चर्चा आहे, तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही. जेव्हा प्रस्ताव येईल, तेव्हा वरिष्ठ चर्चा करतील. काँग्रेसची इतर पक्षांबाबतची भूमिका काय आहे, याचा विचार केला जाईल. अलीकडच्या काळातील दोन-तीन विधानसभा निवडणुकांमुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांना शहाणपण सुचले आहे. राहुल गांधी असोत किंवा ममता बॅनर्जी असतील किंवा  आणखी कोणी असतील, सगळेच तावून सुलाखून निघाले आहेत. पण देशातील संविधान वाचवायचं असेल आणि सत्ताधाऱ्यांवर अंकूश ठेवायचा असेल तर डाव्या विचाराच्या पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी सांगितले.

Nana Patole: नाना पटोलेंना हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावलं

नाना पटोले यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पटोले यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव ऑलरेडी पवार साहेबांनी दिला होता. मात्र, काही कारणास्तव त्यावर निर्णय घेण्यास उशीर झाला. आता देशातील राजकारणात जे काही चाललं आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चालली आहे. अशावेळी सेक्युलर मतांचं विभाजन थांबवण्यासठी, देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवायला, जे काही सेक्युलर विचारांचे पक्ष आहे, त्यांनी एकत्रित यावे, अशी प्रक्रिया सुरु झाली आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले.

आणखी वाचा

NCP Merge into Congress: शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या घडामोडींना वेग? नाना पटोलेंना हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावलं, एअरपोर्टवर म्हणाले…

Comments are closed.