राष्ट्रवादीच्या आमदाराच्या गाडीवर दडफेक, 8 दिवसांपूर्वीच आलं होतं धमकीच पत्र; जिल्ह्यात खळबळ


सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे (NCP) विधानपरिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात दौऱ्यावर असताना चाबुकस्वार वाडीजवळ (Sangli) त्यांच्या कारचा ताफा आला असता अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सुदैवाने या दगडफेकीत आमदार महोदयांना, आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कुठलीही जखम झाली नाही. मात्र, लोकप्रतिनिधींवरील या हल्ल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आमदार इद्रिस नायकवडी यांच्या वाहनांवर अज्ञाताकडून दगडफेक करण्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी मिरज तालुक्यातील जानराव वाडी येथे घडला. मात्र, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी मोटारींच्या मागील काचेचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सध्या आरक्षण सोडत जाहीर केली जात आहे. तसेच, याच किंवा पुढील महिन्यात या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच, पार्श्वभूमीवर आमदार नायकवडी आज मिरज पूर्व भागात दौऱ्यावर होते. त्यांच्यासमवेत माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि पक्षाचे पदाधिकारी होते. चाबुकस्वार वाडी येथील बैठक आटपून जानराव वाडी गावी येथे येत असताना लिमये मळा परिसरात त्यांच्या मोटारीवर अज्ञातांकडून दगड भिरकावण्यात आले. त्यामुळे मोटारीची मागील काच फुटली असल्याचे आमदार नायकवडी यांचे पुत्र माजी नगरसेवक अथर नायकवडी यांनी सांगितले?

8 दिवसांपूर्वी धमकीच पत्र

दरम्यान, नियोजित वेळेनुसार दुपारी 3 वाजता आमदार नायकवडी यांचा चाबुकस्वारवाडी, तर 4 वाजता जानकरवाडी दौरा होता. मात्र, नेहमीप्रमाणे या दौऱ्याला उशिर झाल्याने सायंकाळी ते जानकरवाडी येथे जात असताना हा दगडफेकीचा प्रकार घडला. त्यावेळी दुसऱ्या मोटारीत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासोबत होते. विशेष म्हणजे 8 दिवसांपूर्वी आमदार नायकवडी यांना धमकीचे पत्रही आले असून याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद व्यक्तींकडून टेहळणी केली जात असून पोलिसांना याबाबत माहिती दिल्याचेही अथर नायकवडी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले?

हल्ल्यानंतर आमदारांची पहिली प्रतिक्रिया

मिरज तालुक्यातील गावच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासंदर्भात सध्या माझा दौरा सुरू आहे. जानराववाडी येथून माझा दौरा जात असताना, माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या कारमध्ये मी बसलेलो होतो. तर, माझ्या गाडीत माझे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्ते बसले होते. आम्ही पुढे आल्यानंतर आमच्या मागील गाडीवर दगडफेक करुन अज्ञातांनी पळ काढला आहे. सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. त्या, तपासानंतरच आपण पुढं काय करायचं ते पाहू, असे आमदार इद्रीस नाईकवाडी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा

निलेश घायवळ मूळ पुण्यातला नाही, जामखेडमधील एका खेड्यातला; गुंडगिरीतून कोथरुडमध्ये जमवली माया, कुटुंबीय फरार

आणखी वाचा

Comments are closed.