अजितदादांवर पुन्हा बोलाल तर जीभ हासडू, राष्ट्रवादीच्या आमदाराचा संजय राऊतांना थेट इशारा; म्हणाल
संजय फगवरील इद्रीस नायकवाडी: आशिया कपच्या भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Asia Cup Match) यांच्यातील क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर ‘अर्धे पाकिस्तानी’ असा आरोप केला होता. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवाडी (Idris Naikwadi) चांगलेच आक्रमक झाले आहेत. अजितदादांवर पुन्हा बोलाल तर जीभ हासडू, असा इशाराच त्यांनी संजय राऊत यांना दिलाय.
इद्रिस नायकवाडी म्हणाले की, ज्यांना सगळेजण भोंगा म्हणतात. दररोज सकाळी नऊ वाजता वाचतो. अलीकडच्या काळात भोंग्याचा आवाज गायब झाला होता. पण संजय राऊत यांनी काल फार खालच्या पातळीवर जाऊन अजित पवारांबाबत भाषा वापरली. मला अशा लोकांची कीव येते की, एक महिना देखील झाला नाही. संजय राऊत यांनी सांगितले होते की, अजितदादा सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले आहेत. दादा मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंद आहे. कारण दादा मुख्यमंत्रीपद झेलण्यास एक चांगला नेता आहे. काम करण्याची धमक दादांमध्ये आहे, असे त्यांनी म्हटले होते.
संजय राऊत यांचीच डीएनए चाचणी करावी
काल फार खालच्या पातळीवर जाऊन बोलले. नेत्याच्या अंगात अमुक अमुक रक्त आहे, असे बोलणे अत्यंत अशोभनीय आहे. संजय राऊत कुणाबद्दल काय बोलता. यापेक्षा आता संजय राऊत यांच्या डीएनएची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. आमच्याकडे देखील त्यांचे काही रिपोर्ट आहेत. पण आम्ही राजकारणात काही संयम पाळलेले आहेत. व्यक्तिगत पातळीवर कोणाची निंदा करणे हे आमचे धोरण नाही. अजित पवारांनी कधीही कुठल्या जातीपातीचे राजकारण केलेले नाही. हे सर्व महाराष्ट्राने बघितलेले आहे.
अजितदादांवर पुन्हा बोलाल तर जीभ हासडू
पाकिस्तानच्या संबंधित जोडून आमच्या नेत्याबाबत भाष्य करणे हे त्यांना शोभत नाही. जर संजय राऊत यांनी हा धंदा बंद केला नाही, अजितदादांबाबत एक शब्द जरी काढला तर आमचे कार्यकर्ते त्यांची जीभ हासडून दाखवतील. जेणेकरून अशा पद्धतीची घाणेरडी वक्तव्य पुढच्या काळात त्यांना करता येणार नाही. संजय राऊत यांना फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा इद्रिस नायकवाडी यांनी संजय राऊत यांना दिला.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
भारत-पाकिस्तान सामन्यावरून अजित पवार यांनी खेळाकडे खेळाच्या दृष्टीकोनातून पाहावं, असे म्हटले होते. यावर संजय राऊत यांनी ते मूर्ख राजकारणी आहेत. ते अर्धे पाकिस्तानी आहेत. ते पाकड्या आहेत, जर महाराष्ट्राच्या मंत्र्यांची ही भाषा असेल. तर राष्ट्रभक्ताची भाषा नाही. कळलं अजित पवार? जे 26 लोक गेले, त्यांच्यात तुमच्या घरातील कोणी असते तर तुम्ही असं बोलला नसता, असे टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली होती.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.