काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचा जीव देण्याचा प्रयत्न, गंभीर आरोपांच्या कचाट्यात अडकलेले राष्ट्

नितीन पवार: ग्रामसेवक असणाऱ्या पतीला कळवणचे आमदार नितीन पवार (Nitin Pawar) आणि त्यांच्या पत्नीकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकारी शीतल रामराव महाजन (Sheetal Mahajan) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्याआधी त्यांनी चिठ्ठी लिहून आमदार नितीन पवार आणि त्याच्या पत्नीचे नाव लिहिले होते. त्यामुळे कळवणमध्ये (Kalwan) एकच खळबळ उडाली आहे. महिलेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून आमदार नितीन पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. याप्रकरणी नितिन पवार यांनी सर्व आरोप फेटाळून लावत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे (Ajit Pawar) तक्रार करणार असल्याची माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले नितीन पवार?

नितीन पवार म्हणाले की, आपण चुकीचे काही केले नाही. ग्रामसेवक असताना देखील शबरी घरकुल योजनेचा त्यांनी लाभ घेतला, इतरही अनधिकृत काम केल्याच्या तक्रारी आहेत, त्याविषयी चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात लक्षवेधी मांडली आहे. जर त्या महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर सरकारी रुग्णालयात दाखल होणे अपेक्षित होते, खाजगी रुग्णालयात त्या दाखल का झाल्या? कारवाई करू नये यासाठी दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा दावा आमदार नितीन पवार यांनी केला असून महिलेविरोधात तक्रार करणार असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

नाशिक जिल्ह्यातील कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार व त्यांच्या पत्नी जयश्री पवार ह्या कोणत्या ना कोणत्या कारणाने खोट्या तक्रारी करून ग्रामसेवक असलेल्या पतीस त्रास देतात. म्हणून काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या शीतल महाजन या महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कळवण येथे घडली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या महिलेने तशी चिठ्ठी देखील लिहून ठेवल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार नितीन पवार व जयश्री पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळे शीतल महाजन यांच्या ग्रामसेवक पतीला खोट्या तक्रारी करून अटकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अनेकवेळा चौकशी होऊनही तक्रारीत तथ्य आढळलेले नाही. तरीही, जाणीवपूर्वक त्रास सुरूच होता, असे महाजन यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. नुकतेच विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार नितीन पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत ग्रामसेवक रामराव महाजन यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. आमदार महोदयांकडून जाणीवपूर्वक होत असलेल्या याच त्रासाला कंटाळून शीतल महाजन यांनी विषारी औषध घेऊन स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शीतल महाजन यांचे बंधू योगेश गायकवाड यांनी केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

आणखी वाचा

Sanjay Raut : औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचं संरक्षण, कबर हटवण्याचा अध्यादेश काढण्याची हिंमत आहे का? संजय राऊतांचा थेट वार; म्हणाले,’विहिंप, बजरंग दल आरएसएसचे पिल्लं!

अधिक पाहा..

Comments are closed.