व्यासपीठावरील नेता म्हणाला, ‘माय झ#$ टाकेन पोलिसांची’ अन् मेघना बोर्डीकरांनी टाळ्या वाजवल्या, र
रोहित पवार आणि मेघाना बोर्डीकर: काही दिवसांपूर्वी राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. परभणी जिल्ह्यातील बोरी गावाच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ मेघना बोर्डीकर यांचा हा व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट केला होता. त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला होता. यावर मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) यांनी संबंधित ग्रामसेवक गरीब आणि विधवा महिलांना छळत असल्याचा दावा केला होता. यानंतर रोहित पवार यांनी मंगळवारी मेघना बोर्डीकर यांच्या कार्यक्रमाचे आणखी दोन व्हिडीओ शेअर केले आहेत.
यापैकी एका व्हिडीओत एक व्यक्ती व्यासपीठावर मेघना बोर्डीकर यांच्या शेजारी उभा राहून माईकवरुन बोलत आहे. हा व्हिडीओ बराच जुना असल्याचे सांगितले जाते. या कार्यक्रमाला पोलीसही उपस्थित होते. त्यावेळी या व्यक्तीने पोलिसांना उद्देशून म्हटले की, माझ्या तिकडे गाड्या आहेत. तिकडे कोणी माझ्या लोकांच्या गाड्यांना हात लावला तर माय झ#$ टाकेन पोलिसांची, लक्षात ठेवा. याबाबत काही अफवा असू दे, पण ही सगळी जबाबदारी पोलिसांची आहे, असे संबंधित व्यक्तीने म्हटले. संबंधित व्यक्ती पोलिसांना शिवीगाळ करत असताना राज्यमंत्री असलेल्या मेघना बोर्डीकर बाजूला शांतपणे उभ्या असलेल्या दिसत आहेत. त्यांनी एकदाही संबंधित व्यक्तीला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट मेघना बोर्डीकर टाळ्या वाजवून या व्यक्तीला प्रोत्साहन देत आहेत, असे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे.
आदरणीय मेघनाटाई,
आपल्या कार्यक्रमाचा व्हिडीओ बघितला तर आपण मंत्री असूनही अधिकाऱ्यांकडून आपला इगो दुखावला असल्याचे स्पष्ट दिसून येते. अधिकाऱ्याला कानात मारण्याची भाषा करण्याअगोदर आपण काय बोललात तो व्हिडिओ देखील मी इथं शेअर करतोय, त्यात कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्याने आणि… pic.twitter.com/s0yyn1dnri– रोहित पवार (@rrpspeaks) 5 ऑगस्ट, 2025
तर रोहित पवार यांनी ट्विट केलेला दुसरा व्हिडीओ ग्रामसेवकाला धमकावण्यात आलेल्या बोरी गावातील आहे. या कार्यक्रमाला गर्दी न झाल्यामुळे मेघना बोर्डीकर ग्रामसेवकावर नाराज झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. या व्हिडीओत मेघना बोर्डीकर यांनी त्यांचे भाषण सुरु असताना संबंधित ग्रामसेवकाला त्यांच्यासमोर व्यासपीठाच्या खालच्या बाजूला बोलावून घेतले. त्यांनी या ग्रामसेवकाला विचारले की, तुला पगार कोण देतं? यावर अधिकाऱ्याने ‘शासन’ असे उत्तर दिले. त्यावर बोर्डीकर यांनी म्हटले की, ‘मग ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला सालगड्याचं काम कोणी करायला सांगितलं? गावात घरकुल योजनेचे 1500 लाभार्थी आहेत. मग कार्यक्रमाला सगळेजण का आले नाहीत? त्यावर अधिकाऱ्याने मी सर्व लाभार्थ्यांना निरोप दिल्याचे सांगितले. तेव्हा मेघना बोर्डीकर आणखी संतापल्या. तू नोकरीत कधी जॉईन झाला, तुझ्या नोकरीचे किती दिवस बाकी आहेत? असं काम केलं तर कानाखाली मारेन. तुझी चमचेगिरी बिलकूल चालणार नाही. तू काय कारभार करतो, ते मला माहिती नाही का? मी सीईओ मॅडमना मुद्दाम आज बोलावून घेतले आहे. याद राख पुन्हा चमचेगिरी केली तर तुला बडतर्फ करुन टाकेन. दुसऱ्याची हमाली करायची असेल तर नोकरी सोडून दे, असे मेघना बोर्डीकर या ग्रामसेवकाला बोलत असल्याचे व्हिडीओत ऐकायला मिळते.
https://www.youtube.com/watch?v=fvk-hqjngy0
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.