होय, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी विलिनीकरणाबाबतचा प्रस्ताव आला होता; बड्या नेत्याचा दुजोरा

राष्ट्रवादीचे विलिनीकरण मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यसभेचा अर्ज भरण्याच्या सात दिवस आधी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा (NCP Merger) शेवटचा प्रयत्न करण्यात आला होता. मविआकडून (MVA) शरद पवार (Sharad Pawar) यांना उमेदवारी दिली गेली तर विलिनीकरणाचे सगळे मार्ग बंद होणार, त्यामुळे अजूनही विचार करता येईल, अशा स्वरूपाचा तो एक प्रस्ताव होता. दरम्यान या संदर्भतील एबीपी माझाच्या बातमीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यानं दुजोरा दिला आहे. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाबाबतचा प्रस्ताव आला होता. विलीनीकरण करताना शरद पवारांना संयुक्त राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषित करावे, अशी अट देखील घालण्यात आली होती.

NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावर विचार केला नाही, कारण….

दरम्यानराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावर विचार केला नाही, कारण राज्यसभेचे उमेदवार म्हणून आधीच पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. पार्थ पवार यांच नाव निश्चित झाल्यामुळेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर विचार करता आला नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बड्या नेत्याni आता या संदर्भात माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर राज्यसभेचा अर्ज दाखल केला. भाजपनं चार, शिवसेनेनं एक, राष्ट्रवादीनं एक आणि मविआनं एक उमेदवार दिल्यानं राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकीकडे राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न झाल्याची माहिती राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यानं दिली होती. शरद पवार यांना संयुक्त राष्ट्रवादीकडून राज्यसभेची 6 वर्षांची टर्म दिली जावी.तर पार्थ पवार यांना सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर उमेदवारी दिली जावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आला होता. मात्र, राष्ट्रवादी पक्षाकडून यावर कोणतेच उत्तर न आल्याने अखेर शरदचंद्र पवार पक्षाने मविआकडून उमेदवारी घेत अर्ज भरला आणि आता ही निवडणूक बिनविरोध होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Sharad Pawar and Parth Pawar: आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती

आणखी वाचा

Comments are closed.