राऊतांनी पवारांना सल्ला देऊ नये, त्यांच्या वयाएवढा पवारांचा राजकारणातील कार्यकाळ : आनंद परांजपे

संजय राऊत वर आनंद परानजापे: संजय राऊत यांचं जेवढं वय असेल तेवढा कार्यकाळ शरद पवारांचा राजकारणात गेला आहे. त्यामुळं शरद पवारांना संजय राऊतांनी सल्ला देऊ नये असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी केलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जी राजकीय चिखलफेक झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार (Sharad Pawar) साहेब सुद्धा झिडकरू शकत नाही. ते स्वागत अध्यक्ष होते. ते सुद्धा जबाबदार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर परांजपेंनी टीका केलीय. पवार साहेबांची राजकीय उंची जास्त आहे. त्यामुळं राऊतांकडे फार लक्ष देऊ नका असेही परांजपे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निलम गोऱ्हे यांच्याबाबत बोलणार नाही. त्यांनी ज्या स्टेजवरून हे वक्तव्य केलं हे देखील योग्य नाही असे परांजपे म्हणाले. माणिकराव कोकाटे जिल्हा सत्र न्यायालयात गेले आहेत. काही वेळ कृषिमंत्री यांना दिला पाहिजे. नक्कीच सत्र न्यायालयात त्यांना न्याय भेटेल असेही आनंद परांजपे म्हणाले. राहुल नार्वेकर यांना अद्याप निकालाची प्रत मिळाली नाही. 7 दिवसांचा वेळ असतो असे आनंद परांजपे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?

महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन भरवले आहे का? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे. दरम्यान, शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यावर टीका करत असताना राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनाही (Sharad Pawar) लक्ष्य केलं आहे. हे जे साहित्य महामंडळ आहे त्यांच्याकडे खंडण्या घेऊन संमेलन भरवत आहेत. अशातच माननीय शरद पवार साहेब ही जी राजकीय चिखलफेक झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार (Sharad Pawar) साहेब सुद्धा झिडकरू शकत नाही. ते स्वागत अध्यक्ष होते. ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले राजकीय चिखल फेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष तारा भवळकर यांनी सुद्धा आणि पवार साहेबांनी देखील निषेध व्यक्त केला पाहिजे. ते गप्प कसे राहू शकतात? असा सवाल संजय राऊतांनी यावेळी केला आहे. तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो. हे कोण बाई आहे नीलम गोऱ्हे कुठला भूत आहे? यात राजकारण झालं, हे साहित्य संमेलन नव्हतं. व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचच्या लोकांना का नाही बोलावलं? ते आम्ही कसे घडलो, आम्ही कसे बिघडलो आम्ही देखील सांगितलं असतं. असेही संजय राऊत म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=YKOUFH1WMKY

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Raut : नीलम गोऱ्हेंच्या चिखलफेकीची जबाबदारी पवारसाहेब झिडकारु शकत नाहीत, ते सुद्धा तितकेच जबाबदार : संजय राऊत

अधिक पाहा..

Comments are closed.