2025 मध्ये स्थलांतर करताना आठ हजार लोकांचा मृत्यू
एखाद्या देशांतून दुसऱ्या देशांत स्थलांतर करणे सोपे नाही. तरीही लोक जीव धोक्यात घालून हे स्थलांतर करतात. 2025 च्या आकडेवारीनुसार, स्थलांतर करताना जगभरात 7 हजार 900 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती इंटरनॅशन ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (आयओएम) ने जारी केली आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे 2014 पासून आतापर्यंत 80 हजार लोकांचा स्थलांतर करताना मृत्यू झाला आहे.
स्थलांतर करताना सुरक्षित रस्त्याअभावी लोक मजबुरीने हा प्रवास करत आहेत. ही संख्या पाहून या विरोधात कठोर पावले उचलण्याची गरज आहे, असे आयओएमने म्हटले आहे. जिवाची कोणतीही तमा न बाळगता हे लोक आपल्या कुटुंबासोबत स्थलांतर करत आहेत. 2025 चा आकडा हा 2024 च्या तुलनेत कमी आहे. 2024 मध्ये 9 हजार 200 लोकांचा मृत्यू झाला होता. हे मृत्यू रोखण्यासाठी जागतिक स्तरावर काम व्हायला हवे. यूरोपला जाण्यासाठी समुद्री रस्त्यांवर धोका असूनही हजारो लोक हा प्रवास करतात.
Comments are closed.