संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स संपताच नाशिकच्या विनायक पांडेंनी सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, नीलम
नीलम गोर्हे वर विनायक पांडे: विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप केला आहे. यामुळे ठाकरे गटात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. निलम गोऱ्हे ही निर्लज्ज, नमकहराम बाई आहे, असे त्यांनी म्हटले. तर, नीलम गोऱ्हे यांनी नाशिकच्या विनायक पांडेंना (Vinayak Pande) उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा गौप्यस्फोट केला. यानंतर ठाकरे गटाचे नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केलाय.
विनायक पांडे म्हणाले की, 2014 ची विधानसभा निवडणूक लागली मी आणि अजय बोरस्ते दोघे ही इच्छुक होतो. नीलम गोऱ्हे यांचा भैय्या बहाते कार्यकर्ते होता. त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्याशी बोलायचे का असे सांगितले. तेव्हा मी हो सांगितले. नीलम ताईंना काही रक्कम दिली त्यांनतर अजय बोरस्ते यांना तिकीट देण्यात आले. मी त्यांना सांगितले मला पैसे द्या अन्यथा पत्रकार परिषद घ्यावी लागेल. त्यांनी मला बोलवून पैसे दिले. मात्र, त्यात काही पैसे कमी दिले आहेत, असा दावा त्यांनी केला.
नीलम ताईंनी माझ्याकडून पैसे घेतले
विनायक पांडे पुढे म्हणाले की, शिवसेना प्रमुख किंवा उद्धव ठाकरेंनी कधीही माझ्याकडून पदासाठी पैसे मागितले नाही. पण नीलम ताईंनी माझ्याकडून पैसे घेतले. आता राज्यभरातून असे अनेक कार्यकर्ते पुढे येतील. मराठी साहित्य संमेलन होते तिथे त्यांनी अशी भूमिका मांडायला नको होती. आता राज्यातील अनेक नेते पुढे येतील. पैसा दिल्याशिवाय ही बाई कार्यकर्त्यांना पुढे येऊ देत नव्हती. मला 43 वर्ष झाली, मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी कायम खुले होते. या बाईने जिथे जिथे संपर्क नेते होते, तिथे असेच केले आहे. तिकीटासाठी माझ्याकडे पैसे मागितले, स्पर्धा होती म्हणून पैसे मागितले. पण, तिकीट अजय बोरस्ते यांना दिले. मी उपमहापौर, महापौर झालो. पण कधीच पैसे दिले नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=X9UWT1VNZWA
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.