न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगाप्रमाणे स्पर्धा परिक्षा घेणारी यंत्रणा ही सुद्धा भाजपने ताब्यात घेतली आणि देशाचे वाटोळे केले – संजय राऊत
नीट पेपर फुटीमुळे देशातल्या हजारो लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आणि त्याचा केंद्रबिंदू महाराष्ट्र आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत यांनी केली. तसेच न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगाप्रमाणे स्पर्धा परिक्षा घेणारी यंत्रणा ही सुद्धा भाजपने ताब्यात घेतली आणि देशाचे वाटोळे केले असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, जर देशात आणखी दोन राज्यात निवडणुका असत्या तर कदाचित संकट वाढलं नसतं. जसं पश्चिम बंगालसह, आसाम, केरळमध्ये निवडणुका होत्या. तोपर्यंत पंतप्रधान मोदी आणि सरकार सांगत होतं की, भारतीय जनतेला काहीही तोषिस पडणार नाही. तीन महिने पुरेल इतका इंधन साठा आहे आणि सर्व आलबेल आहे. निवडणुकांचे निकाल लागताच पंतप्रधा मोदी स्वतः इटली, नेदरलँड सारख्या परदेशात गेले. आणि भारतीय जनतेला 15 दिवसांत किमान चार वेळा इंधन दरवाढीचा बोझा टाकून ते आता ऑस्ट्रेलियामध्ये चालले आहेत अशी माझी माहिती आहे. भारतीय जनेतेने, प्रवास करायचा नाही, घराबाहेर पडायचं नाही, इंधन बचत करायची असा सल्ला पंतप्रधानांना दिला आहे. उन्हाळा वाढला आहे, भरपूर पाणी प्या असेही त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्राच्या धरणात फक्त 17 टक्के पाणी शिल्लक आहे, पाणी प्यायचं कसं? असे संजय राऊत म्हणाले.
राज्य आणि केंद्र सरकार आहे हे जनतेची फसवणूक करत आहेत. जनतेशी खोटं बोलत आहे. हे सरकार जनतेशी प्रामाणिक नाही. देशाची आर्थिक व्यवस्था कोलमडली असून अत्यंत गंभीर स्थितीत आहे. या देशात आर्थिक वादळ येणार असे राहुल गांधी म्हणाले ही बाब खरी आहे. पण त्याची चिंता या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि देशाच्या पंतप्रधानांना दिसत नाही. ते आता हवेत आहेत आणि जमिनीवर नाहीत. नीट पेपरफुटीचे केंद्र हे महाराष्ट्रात आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. नीट पेपरफुटीचे केंद्र जर महाराष्ट्रात असेल, त्याचा केंद्रबिंदू लातूरपासून पुण्यात पसरलेला असेल तर त्याची जबाबदारी ही देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याइतकीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यातला मास्टरमाईंड तेजस शहा याला सीबीआयने अटक केली. याचा अर्थ काही वाईट घडायचं असेल तर महाराष्ट्राशी शहा कनेक्शन असतंच. याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस घेणार का? देशातल्या हजारो लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले आणि त्याचा केंद्रबिंदू महाराष्ट्र आहे. आपण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सुशासनाच्या गोष्टी करतो, एका पिढीचे भविष्य तुम्ही बर्बाद केले आहे, आणि फडणवीस त्यावर काहीच बोलायला तयार नाहीत. यावर किमान एक पत्रकार परिषद तरी घ्यावी आम्ही त्यावर प्रश्न विचारू. याचा अर्थ या पेपरफुटीमागे भाजपच आहे, आपापल्या लोकांना पेपर आधी मिळावेत आणि त्यांना गुण मिळावेत यासाठी पेपर फेडण्याचे नेटवर्क भाजपच्या काही प्रमुख लोकांनी तयार केले. जशी न्यायव्यवस्था ताब्यात घेतली, निवडणूक आयोग ताब्यात घेतला, पोलीस यंत्रणा ताब्यात घेतली, त्या प्रमाणे स्पर्धा परिक्षा घेणारी यंत्रणा ही सुद्धा भाजपने ताब्यात घेऊन या देशाचे कसे वाटोळे केले आणि त्याचा केंद्रबिंदू दुर्दैवाने महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्रातली शिक्षण संस्थेला देशात मान होता, ते पेपर फुटीचे केंद्र म्हणून समोर आले आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणंमंत्री कुठे आहेत? यावर त्यांनी काय भूमिका घेतली आहे? या प्रकरणांवर सीबीआय कारवाई करत आहे. या राज्याचे गृहमंत्री किंवा त्यांचे पोलीस नीट प्रकरणी कारवाई करत नाहियेत. हा एक गंभीर विषय आहे. महागाई बाबत पंतप्रधानांनी आवाहन केले आहे की भरपूर पाणी प्या. तसेच राज्यात एक आवाहन केले जाईल की पाणी प्यायलं की आपोआर त्याचे पेट्रोल होईल, आणि ते पेट्रोल वापरा. कारण हे नवीन हिंदुत्व आहे. आता महाराष्ट्रात वडापाव सोबत मस्त्यपाव येणार आहे. पण खीमा पाव नाही खायचा. कारण त्याचा संबंध मुस्लिम समाजाशी आहे. काल या राज्यामध्ये मुस्लीम सणावरून राज्यात दंगली व्हायचा प्रयत्न झाला हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही. तुम्ही स्वतःच्या दुकानात मटण विकता, अर्ध्या मंत्र्याचे हॉटेल्स आहेत. त्यांनी आता तिथे फक्त श्रीखंड पुरी विका. महाराष्ट्र मांसाहारी आहे, महाराष्ट्र हा क्षत्रिय धर्म पालन करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अत्यंत चुकीच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे असेही संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.