55 रेडे कापून सत्तेवर आलेल्या लोकांनी कुर्बानीला विरोध करणे म्हणजे मानसिक गोंधळ, संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सोसायट्यांमध्ये बकऱ्यांची कुर्बानी द्यायची की नाही यावर गृहमंत्र्यांनी आणि पोलिसांनी बसून तोडगा काढायला पाहिजे, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत यांनी केले आहे. तसेच 55 रेडे कापून सत्तेवर आलेल्या लोकांनी कुर्बानीला विरोध करणे म्हणजे मानसिक गोंधळ आहे असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, सोसायट्यांमध्ये बकऱ्यांची कुर्बानी द्यायची की नाही यावर गृहमंत्र्यांनी आणि पोलिसांनी बसून तोडगा काढायला पाहिजे. महाराष्ट्राचं सरकारच देवळात बळी देऊन आलेलं आहे. 55 रेडे कामाख्या देवीच्या मंदिरात कापले गेले ही कुर्बानीच आहे. या अंधश्रद्धेला आमचा आक्षेप आहे. 55 रेडे कापून जे सरकार सत्तेवर आले आहे ते दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करत आहेत, हा मानसिक गोंधळ आहे. महाराष्ट्रात मांसाहार होणार. पद्धतीत काही बदल होऊ शकतात. पण आधी जे मुस्लिमांच्या कुर्बानीला विरोध करत आहेत, त्यांनी आधी मंदिरात 55 रेडे कापणाऱ्यांनाही विरोध केला पाहिजे हे माझं मत आहे, असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातून जर शिंदे नावाच गट नेस्तनाबूत करण्याचा चंग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बांधला असेल तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे राहू. शिंदे गट ही घाण आहे आणि बेईमानीची कीड आहे, ती जर दूर होत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू, असे संजय राऊत म्हणाले.

या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आधीच गुदमरलेले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणतात की एकनाथ शिंदे आमचे मित्र आणि सहकारी आहेत, त्या फडणवीसांना ओळखतात त्यांना फडणवीसांचे संकेत बरोबर कळतात. त्यामुळे भविष्य़ात जे घडणार आहे त्याची ही नांदी आहे. विधानपरिषदेची निवडणूक भाजपा आणि शिंदे गट एकत्र लढणार नाहीत यासाठी सुरू आहे.

महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष दोनच आहेत, एक शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचा ज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत आणि दुसरा शरद पवार याच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस. हे दोनच प्रादेशिक पक्ष आहेत ते राज्याच्या अस्मितेवर बोलतात आणि भूमिका मांडतात. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष संपलेला आहे, हे मला दुर्दैवाने म्हणावंसं वाटतंय. अजित पवार यांना मूळ पक्षातून बाहेर काढण्याचे काम प्रफुल पटेल, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी केलं असं शरद पवार यांचं मत होतं. अजित पवारांचे डोकं फिरवणारी ही माणसं आहेत. त्यामुळे हा पक्ष भविष्यात फार काळ राहणार नाही असं माझं मत आहे. शिंद्यांचाही पक्ष राहणार नाही, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.

Comments are closed.