चिमुरडी सुट्टीत घरी आली, पण नराधम आजोबांनी नको ते कृत्य केलं, चुलत भावाकडूनही अत्याचार, बीडचं न

बीड: बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर (Beed Crime News) साठ वर्षाच्या आजोबांनीच अत्याचार (Beed Crime News) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तर पीडितेच्या चुलत (Beed Crime News) भावाने देखील तिच्यावर दीड वर्षांपूर्वी अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आजोबा आणि चुलत भाऊ यांच्यावर पोक्सो ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.(Beed Crime News)

Beed Crime News : मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून आजोबांनी…

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील गावात आजोबा आजी सोबत राहणाऱ्या 15 वर्षाच्या मुलीचे आई-वडील बाहेरगावी कामाला गेलेले आहेत. सध्या शाळेला सुट्ट्या असल्याने आजी आणि इतर भावंडे शेतात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून आजोबांनी तिच्यासोबत बळजबरी करत लैंगिक अत्याचार केला. कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली गेली. सदरील घटना घडल्यानंतर पीडितेच्या पोटात दुखू लागले त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांना संशय आल्यानं तिला विश्वासात घेतल्यानंतर घडलेली आपबीती मुलीने डॉक्टरांना सांगितली.(Beed Crime News)

Beed Crime News : दीड वर्षांपूर्वी तिच्या चुलत भावाने देखील…

दरम्यान ही घटना घडल्यानंतर दीड वर्षांपूर्वी तिच्या चुलत भावाने देखील तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. याबाबत पोलिसांना माहिती देताच सदरील प्रकरणात नेकनूर पोलीस ठाण्यात आजोबा आणि चुलत भावा विरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे.या संतापजनक घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, नात्यांवरचा विश्वास हादरवणारी ही घटना असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन मुलीवर स्वतःच्या आजोबांकडून अत्याचार झाल्याचे समोर आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून वैद्यकीय तपासणी केली असून, संपूर्ण प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर गावात संतापाची लाट पसरली असून आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कुटुंबातीलच व्यक्तीकडून अत्याचार झाल्याने सामाजिक पातळीवरही चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

Beed Crime News: बीडमध्ये मुलाचं सावत्र आईसोबत प्रेमसंबंध; बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!

बीडमध्ये सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांचा अत्यंत थरारक शेवट अंबाजोगाई येथे झाला आहे. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून, तर प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. घटनेमुळे केज आणि अंबाजोगाई परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील सोनी जवळा येथील एका  व्यक्तीचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर चार वर्षांपूर्वी त्यांनी एका महिलेशी दुसरे लग्न केले. संसार सुरू असतानाच, पहिल्या पत्नीचा मुलगा वय २१ वर्ष याचे आपल्या सावत्र आईशी प्रेमसंबंध जुळले. हे सूत इतके टोकाला गेले की, काही दिवसांपूर्वी हे दोघे घरातून थेट तेलंगणा राज्यात पळून गेले.

दरम्यान आपली पत्नी आणि मुलगा दोघेही बेपत्ता झाल्याने पतीने पोलिसांत धाव घेतली पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत तेलंगणा गाठून त्या दोघांनाही ताब्यात घेतले.आपले अनैतिक संबंध आता सगळ्यांना समजले आहेत,या भीतीपोटी आणि नैराश्यातून तरूणाने विषारी घेतले प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. आपला प्रियकर (नात्याने सावत्र मुलगा) याच्या मृत्यूची बातमी समजताच सावत्र आईला हिला तीव्र धक्का बसला. हा विरह सहन न झाल्याने तिने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केलीय या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.