इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणीनं आयुष्य का संपवलं?

Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: सोलापूर (Solapur Crime) जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात (Mangalwedha Taluka) घडलेल्या धक्कादायक घटनेनं सर्वांना थक्क केलंय. अवघ्या 25 वर्षांच्या विवाहित रिल स्टारनं (Reel Star Rohini) आपलं आयुष्य संपवलं. मंगळवेढा तालुक्यात आपल्या पतीसोबत ‘हॉटेल ग्रामपंचायत’ (Hotel Gram Panchayat) चालवणाऱ्या रोहिणी निलेश पाराध्ये (Rohini Paradhye) हिनं आत्महत्या केली.  मंगळवारी दुपारी साडेदोनच्या सुमारास घडली. ब्रह्मपुरी येथील ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या स्वयंपाकघरात मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास रोहिणी यांनी पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेतल्याचं समोर आलंय. पण, रोहिणीनं असं टोकाचं पाऊल का उचललं? हाच प्रश्न तिच्या फॉलोअर्सना आणि अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे फेमस रील स्टार रोहिणी पाराध्ये हिनं गळफास घेऊन आत्महत्या प्रकरणी आता पोलीस मृत्यूच्या कारणाचा शोध घेऊ लागले आहे.  ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावानं व्यवसाय करत असणाऱ्या आपल्याच हॉटेलात रोहिणीनं टोकाचं पाऊल उचललं. हॉटेल व्यवसायाच्या शाखा वाढल्या आणि यातून आलेल्या तणावामुळे आणि झालेल्या वादामुळे रोहिणीनं रागात आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.

‘त्या’ दिवशी नेमकं घडलं काय?

मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील हॉटेल ग्रामपंचायत याच ठिकाणी रोहिणी आपले पती निलेश सोबत राहत होती. सोमवारी हॉटेलच्या साप्ताहिक सुट्टीनंतर मंगळवारी हॉटेल ग्रामपंचायत हे उघडलेच गेले नाही. याच दरम्यान दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रोहिणीने स्वतःच्या स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. याबाबत रोहिणीला उपचारासाठी तातडीने मंगळवेढा येथे नेण्यात आले. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा शेवट झाला.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी आणि तिचे पती निलेश यांचा प्रेमविवाह झाला होता. आंतरजातीय विवाह करून हे दोघेही पुणे येथे काही काळ वास्तव्य करत होते. पुणे इथे असतानाच हे दोघेही रील करू लागले. यानंतर आपल्या मूळ गावी परतल्यानंतर त्यांनी ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावानं हॉटेल व्यवसाय सुरू केला. हॉटेलमधील रोजच्या खेळीमेळीच्या वातावरणातील रील बनवून रोहिणी आणि निलेश दोघेही प्रसिद्ध झाले आणि त्यांचं हॉटेलही यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलं. याच काळात त्यांनी मंगळवेढा तालुक्यातच दोन ठिकाणी नव्यानं हॉटेलच्या शाखा सुरू केल्या. मात्र, या दोन्ही शाखांचं व्यवस्थापन करणं, जिकरीचं होत असतानाच. आर्थिक घडी नीट बसवणं आणि शाखा चांगल्या चालवणं, अशा गोष्टींची तारेवरची कसरत होत होती. यातूनच दोघांत वाद आणि तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. रोहिणीनं हे टोकाचं पाऊल उचललं असावं अशी चर्चा आहे. महत्वाचं म्हणजे, रोहिणीचा निलेश सोबतच दुसरा विवाह असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नीलेशसोबत प्रेमविवाह झाल्यावर नक्की कुठल्या कारणानं तिनं हे टोकाचं पाऊल उचललं? नक्की दोघांमधील मतभेद होता की, अन्य कुठलं वेगळं कारण होतं का? याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. मात्र याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस आता आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.

पाहा व्हिडीओ : Manglvedha News : सोलापूरची रिल स्टार असणाऱ्या विवाहितेची आत्महत्या

महत्त्वाच्या इतर बातम्या :

इन्स्टाग्रामवरील फेमस रिलस्टार, हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण, रोहिणी पाराध्येनं ज्या किचनमधून रिल्स बनवले तिथेच आयुष्य संपवलं

ABP माझाच्या बातम्या LIVE…

आणखी वाचा

Comments are closed.