चंद्रपूरच्या अनिलला नीट परीक्षा 99.99 टक्के मिळाले, पण डॉक्टर होण्यापूर्वीच सगळंच संपलं, अॅडमिश
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur News) १९ वर्षीय विद्यार्थ्याने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी निघण्याच्या दिवशीच टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनुराग अनिल बोरकर (Anurag Anil Borkar)असे या विद्यार्थ्याचे नाव आहे, डॉक्टर बनू इच्छित नसल्याची सुसाईड नोट लिहून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील रहिवासी अनुराग आपल्या कुटुंबासह राहत होता आणि त्याने नुकतीच नीट युजी २०२५ ची परीक्षा ९९.९९ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता आणि ओबीसी श्रेणीत १४७५ वा क्रमांक मिळवला होता. त्याच्या यशानंतर, तो एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जाण्याची तयारी करत होता.(Chandrapur News)
Anurag Anil Borkar Death: त्याला डॉक्टर बनायचे नव्हते…
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अनुरागने गोरखपूरला जाण्यापूर्वीच त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. तो घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुरागने लिहिले होते की त्याला डॉक्टर बनायचे नाही. या प्रकरणाचा सध्या नवरगाव पोलिसांकडून तपास सुरू आहे.
नीट परीक्षेत यश मिळविल्यानंतर डॉक्टर व्हायचे नसल्याने या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती सिंदेवाही पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. अनुरागने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मधून ही माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेशासाठी जाण्यापूर्वी त्याने आपले जीवन संपविले, त्याचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होते. मात्र त्याच्या आत्महत्येने हे स्वप्न अपूर्णच राहिले. त्याला काल सकाळी एमबीबीएस प्रवेशासाठी गोरखपूर येथे जायचे होते. परंतू राहते घरीच त्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास नवरगाव पोलीस करीत आहे.
Anurag Anil Borkar Death: आईला त्याच्या खोलीतील लाईट सुरू असल्याचे दिसले
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरकर यांचा अनुराग हा मुलगा होता. त्याने नुकत्याच पार पडलेल्या नीट यूजी-२०२५ परीक्षेत मोठं यश मिळवले होते. त्याला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाला प्रवेश मिळाला होता आणि याच प्रवेशासाठी त्याला काल (मंगळवार २३ सप्टेंबर रोजी) पहाटे गोरखपूरला ते जाणार होते. मात्र, त्याआधीच त्याने आपले जीवन संपवले. मंगळवारी (दि. २३) पहाटे उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेश करण्यासाठी जायचे असल्याने सोमवारी (दि. २२) रात्री जेवण झाल्यानंतर बोरकर कुटुंब अंदाजे १०.३० च्या सुमारास झोपले. मंगळवारी पहाटे २.३० वाजता अनुरागच्या आई बाथरूमकरिता उठली असता आईला त्याच्या खोलीतील लाईट सुरू असल्याचे दिसले. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता, अनुराग पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळून आला. त्यांनी तातडीने पती अनिल बोरकर यांना याची माहिती दिली. दोघांनी मिळून गळ्यातील दोर कापून त्याला खाली उतरवले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. अभ्यासामध्ये अत्यंत हुशार असलेल्या अनुरागने असे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांना मोठा धक्का बसला. तो एक हुशार आणि मेहनती विद्यार्थी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी चार वाजता अनिल बोरकर यांचा मुलगा अनुराग बोरकर 19 वर्ष यांनी गळफास लावून आत्महत्या केली अशी माहिती मिळाली. याबाबत चौकशी सुरू आहे त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. ती देखील घटनास्थळावरून मिळाली आहे या सुसाईड नोट मध्ये मला डॉक्टर व्हायचं नाही असं त्याने लिहिलेला आहे एकंदरीत सुसाईड नोट पाहता अभ्यासाचं आणि बाकी टेन्शन त्याला आल्याने आणि ते प्रेशर व्यवस्थित हँडल करू शकला नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचा दिसून येत आहे असे पोलिसांनी सांगितलं आहे
आणखी वाचा
Comments are closed.