नेपाळने लादला हिंदुस्थानी मालावर कर, 100 रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर शुल्क
हिंदुस्थानातून 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सामान नेपाळमध्ये नेल्यास त्यावर सीमा शुल्क आकारले जाणार आहे. नेपाळच्या बालेन शाह सरकारने ही वसुली सुरू केली आहे. याचा थेट परिणाम हिंदुस्थान-नेपाळ सीमेवर राहणाऱ्या लोकांवर आणि छोटय़ा व्यापाऱ्यांवर होत आहे. नेपाळ सरकारच्या या निर्णयाविरोधात देशभरात निदर्शनांच्या माध्यमातून संताप व्यक्त होत आहे.
नेपाळच्या सीमेवरील लोक दैनंदिनी गरजांसाठी रोजचे सामान मीठ, तेल, भाजीपाला, औषधे घेण्यासाठी हिंदुस्थानात ये-जा करतात. गेली कित्येक वर्षे हे सुरू आहे. नेपाळमध्ये हिंदुस्थानपेक्षा सामानांच्या किमती जास्त आहेत. त्यामुळे नेपाळी लोक सीमापार येऊन सामान खरेदी करतात. मात्र आता या खरेदीवर सरकारने कर लावला आहे. नेपाळ काँग्रेसमध्ये खरं तर हिंदुस्थानी मालावर सीमा शुल्क लावण्याचा कायदा 2023 साली झाला. त्या कायद्याअंतर्गत सीमा शुल्क 5 ते 80 टक्के आकारण्यात येत आहे. अगदी 100 रुपयांवरील सामानाच्या खरेदीवर शुल्क घेतले जाणार आहे. नेपाळच्या अर्थतज्ञांचे म्हणणे आहे की, 100 रुपयांची खरेदी मर्यादा खूप कमी आहे. ती वाढवून एक हजार रुपये एवढी केली पाहिजे.
सीमा शुल्कामधून नेपाळ सरकारला 40 टक्क्यांहून जास्त महसूल मिळतो. हिंदुस्थानसोबत सर्वाधिक व्यवहार होतो. मात्र 100 रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर शुल्क आकारणे योग्य नाही. याचा थेट परिणार हातावर पोट असणाऱ्या लोकांवर होणार आहे. – डॉ. गोविंद राज पोखरेल, माजी उपाध्यक्ष, राष्ट्रीय योजना आयोग, नेपाळ
Comments are closed.