Maharashtra Live Updates: मुंबईत आज आणि उद्या पाणीपुरवठा खंडित; काही भागात कमी दाबाने पाणी, 18
विधान परिषदेसाठी आज भाजपची खलबतं
भाजपच्या कोअर कमिटीची आज रात्री १० वाजता वर्षा निवासस्थानी बैठक पार पडणार
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नावांची चर्चा बैठकीत पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती
परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती
आजच्या बैठकीतील चर्चेनंतर भाजपकडून काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला पाठवला जाणार
विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला १० पैकी ६ जागा मिळणार
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी नावांची चर्चा बैठकीत पार पडणार
विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब – सूत्र
इतर ५ नावांवर चर्चा होत असताना जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा देखील विचार होणार असल्याची माहिती
विधान परिषदेसाठी इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्यास सुरुवात
मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्यांच्या सह्याद्री अतिथीगृह आणि काल मुंबईतील मेळाव्यात गाठीभेटी
माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी यांच्या नावांची चर्चा
Comments are closed.