US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले…

US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम वाढवला आहे. पाकिस्तानच्या विनंतीनुसार हा युद्धविराम वाढवण्यात आला. सध्याचा युद्धविराम संपण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वीच, पाकिस्तानच्या विनंतीवरून ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावरून ही माहिती जाहीर केली.इराणकडून एखादा प्रस्ताव प्राप्त होईपर्यंत, आपण शत्रुत्व थांबवण्याची ही प्रक्रिया  पुढे वाढवत असल्याचे डोनाल्ड स्पष्ट केले. परिणामी, युद्ध तूर्तास टळले आहे आणि मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानला, अमेरिका व इराण यांच्यात चर्चेची नवीन फेरी घडवून आणण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे. इराण प्रस्ताव देईपर्यंत आणि दोन्ही देशांची शांतीवार्ता होईपर्यंत हा युद्धविराम असेल असं डोनाल्ड स्पष्ट केलं आहे. मात्र एकीकडे युद्धविरामात वाढ केली असली तरी होर्मुझची नाकेबंदी कायम राहणार आहे. युद्धविराम आणि चर्चेबाबत इराण सरकारमध्ये गंभीर स्वरूपाचे मतभेद आहेत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तिथल्या नेत्यांना एक संधी देण्यासाठी अमेरिकेने हल्ले थांबवले आहेत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

Comments are closed.