व्याजाच्या बदल्यात शरीरसंबंध; आरोपीकडे 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा पीडितेचा सनसनाटी दावा

कोल्हापूर गुन्हे: व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेवर अत्याचार करून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर शहरानजीक घडला. या प्रकरणात आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. संबंधित आरोपीच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे. संबंधित पीडित महिलेने असा दावा केला आहे की हे सर्व प्रकरण आरोपीच्या पत्नीला माहिती होते. आरोपीने त्याच्या मित्राला सर्व अश्लील व्हिडिओ दाखवले आहेत. त्यामुळे अन्य कोणत्या महिला या दोघांना बळी पडू नयेत यासाठी कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित महिलेने केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्याजाने दिलेले पैसे परत केले नाहीत त्यामुळे जबरदस्तीने शरीर संबंध ठेवायला लावण्यास भाग पाडल्याची घटना कोल्हापूरजवळ घडली. संबंधित सावकाराचा त्रास असह्य झाल्याने पीडित महिलेने गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी संशयित अमित सावंतला अटक केली. पीडित महिलेने घरगुती अडचणींसाठी सावंतकडून 10 टक्के व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते, ज्याची नियमित परतफेड न झाल्याने त्याने शारीरिकसंबंधांची मागणी केली. आरोपीने महिला घरी एकटी असताना तिच्यावर अत्याचार करून अश्लील फोटो व व्हिडिओ काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी हॉटेल आणि कारमध्ये छळ केला.

पीडितेच्या कुटुंबाची बदनामी सुरूच ठेवली

नोव्हेंबर 2025 पर्यंत व्याजासह संपूर्ण रक्कम परत करूनही, आरोपीने जादा पैशांची मागणी करत पीडितेच्या कुटुंबाची बदनामी सुरूच ठेवली. आरोपीने महिलेचे अश्लील व्हिडिओ कार मालकाला पाठवले आणि जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या जावयालाही हॉटेलवर बोलावून बेदम मारहाण केली. या त्रासाला कंटाळून महिलेने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत नराधमाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

इस्त्री दुकानदाराची दुकानामध्येच आत्महत्या

दरम्यान, आज (22 एप्रिल) कोल्हापूर शहरातील नागाळा पार्कमध्ये इस्त्री दुकानदाराने आपल्या दुकानामध्येच गळ्याला दोरी लावून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली. कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. या घटनेची नोंद  शाहूपुरी पोलिसात झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.