Weather Update – दुपारी ‘हाय गरमी’, तर संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई, ठाण्यासह काही जिल्ह्यांना दोन दिवसांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई, ठाण्यासह किनारपट्टीवरील व लगतच्या जिल्ह्यांमध्ये 23 आणि 24 एप्रिल रोजी दुपारी उष्णता, आर्द्रता आणि संध्याकाळी मात्र मेघगर्जनेसह पाऊस असे असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तशी शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 23 एप्रिल रोजी ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत उन्हाचा कडाका राहील. दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलका किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 24 एप्रिल रोजी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांतील हवामान कायम राहील. मात्र रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि लगतच्या भागात तसेच मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जालना, परभणी, हिंगोली आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये हलका पावसाची शक्यता आहे.

अमरावती आणि अकोला जिल्ह्यांत 24 एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसण्याची शक्यता असून या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, असे एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

Comments are closed.