नेपाळच्या पंतप्रधानांचा वर्षभर ‘नो विदेश दौरा’

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नेपाळचे नवे पंतप्रधान बालेंद्र शाह हे वर्षभर कोणत्याही विदेश दौऱ्यावर जाणार नाहीत, अशी माहिती आरएसपीचे महासचिव भूप देव शाह यांनी दिली. बालेन शाह यांनी घेतलेली ही भूमिका हिंदुस्थानसाठी झटका मानली जात आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्चमध्ये शपथविधी पार पडल्यानंतर बालेन शाह यांचे अभिनंदन करत त्यांना हिंदुस्थान भेटीचे निमंत्रण दिले होते.

बालेन शाह हे निश्चित विदेश दौऱ्यावर जातील, परंतु सध्या त्यांनी नेपाळमधील जनतेच्या मुद्दय़ावर आणि विकास करण्यावर आपले लक्ष्य पेंद्रित केले आहे, असे भूप देव शाह यांनी सांगितले.

g 2014 पासून सहापैकी पाच पंतप्रधानांनी सर्वात आधी हिंदुस्थान दौरा केला होता. त्यामुळे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी वर्षभर कोणताही विदेश दौरा न केलेल्या भूमिकेमुळे विदेश दौऱ्यात बदल होणार की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान नेपाळच्या नव्या पंतप्रधानांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक वर्ष कोणताही विदेश दौरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

Comments are closed.