नेपाळचे नेते शाह आज भारतात येणार आहेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नेपाळचे नेते बलेंद्र शाह यांच्या भारत दौऱ्याला रविवारपासून प्रारंभ होत आहे. नेपाळमध्ये त्यांनी यावर्षी मार्चमध्ये सत्ता स्थापन केली. त्यानंतरची त्यांची ही प्रथमच भारत भेट आहे. त्यांच्या या भारत दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची चर्चा होणार असून दोन्ही देशांमधील सहकार्यावर ते भर देतील, अशी शक्यता आहे. भारत-नेपाळ सीमाशांतता, द्विपक्षीय संबंध, व्यापार, ऊर्जा सहकार्य, कनेक्टिव्हिटी आणि विकासातील भागीदारी या सर्व विषयांचा उहापोह दोन्ही नेते करतील, अशी माहिती देण्यात आली. शाह यांचे भारतात जोरदार स्वागत होणार असून त्यांना शाही सन्मान दिला जाईल, असे भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने स्पष्ट केले. दोन्ही देशांना एकमेकांसंबंधी आदर असून त्यांचे सहकार्य या भागाची शांतता आणि प्रगती यासाठी अत्याधिक महत्वाचे आहे, असे अनेक तज्ञांचेही मत आहे.
Comments are closed.