न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना दिलासा, 25000 रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार

न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळा: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (New India Co-operative Bank Scam) ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. 27 फेब्रुवारी 2025 पासून प्रति ठेवीदाराला 25 हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. ठेवीदार हे पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखेचा तसेच एटीएमचा देखील वापर करु शकतात. सोबतच, आरबीआयने नेमलेल्या बॅंकेच्या सल्लागार समितीत देखील बदल करण्यात आला आहे.

हितेश मेहतासह धर्मेश पान आणि अभिमन्यू भोन यांना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक (New India Cooperative Bank case) गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली होती. बँकेचं सर्व संचालक मंडळ बरखास्त केलं होतं. यानंतर  बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता यांना ( Hitesh Mehta) अटक केली होती. हितेश मेहतांवर दादर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. हाच गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. हितेश मेहतांवर न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या दादर व गोरेगाव येथील शाखेतन 122 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी हितेश मेहतासह धर्मेश पान आणि अभिमन्यू भोन यांना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. RBI ने कारवाईनंतर न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध आणले होते. न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक वर आरबीआय बँकेने निर्बंध लादले आहेत. यामुळं या बँकांच्या बाहेर ठेवीदारांची मोठी गर्दी आहे.

बँकेच्या ठेवीदार आणि ग्राहकांना मोठा धक्का

30 पेक्षा जास्त शाखा असलेल्या आणि बहुराज्य सहकारी बँकेचा दर्जा मिळविलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादण्यासह तिचे संचालक मंडळ बरखास्त करणारी कारवाई केली. तसेच  या बँकेवर ‘प्रशासक’ नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन कर्जवाटपासह सहा महिन्यांसाठी ठेवी काढण्यावर बंदी घालण्याचा आदेश न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला देण्यात आले. त्यामुळे या बँकेच्या ठेवीदार आणि ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. बँक खातेदार आणि नागरिक हतबल झाले असून आरबीआयला देखील दोष देत आहेत. दरम्यान,  न्यू इंडिया को बँकेचे अनेक राजकीय व्यक्ती ही कर्जदार आहेत. अनेक मोठ्या रकमा कर्ज म्हणून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बँकेला बुडवण्यात नक्की कोण कोण जबाबदार आहे हे तपासातूनच समोर येईल. मात्र, यात सर्वसामान्य ठेवीदार ज्यांची आयुष्यभराची कमाई ठेवली होती, तो मात्र हतबल होऊन रोज बँकेच्या दारात उभा राहतोय ही ह्रदयस्पर्शी घटना आहे.

महत्वाच्या बातम्या:

न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण! तीनही आरोपींना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

अधिक पाहा..

Comments are closed.