शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धास आनंदाश्रू

मुंबई : कांदिवली येथील शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या नेत्याने एका वृद्ध मराठी कुटुंबीयांचा गाळा हडप केल्याचे वृत्त माध्यमांत झळकल्यानंतर शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकेनाथ शिंडे (एकनाथ शिंदे) यांनी थेट दखल घेत संबंधित गाळा ज्या व्यक्तीचा आहे, त्यांना देण्याचे आदेश दिले होते. मात्र, लालसिंह राजपुरोहित यांनी पक्षप्रमुखांचा आदेश देखील न जुमानल्याने अखेर पोलिसांनी राजपुरोहित यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर, स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज तो गाळा आपल्या ताब्यात घेऊन या जागेचे मूळ मालक असलेल्या पै कुटुंबीयांना सुपूर्द केला. यावेळी, पै कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. आपलं दुकान पुन्हा आपल्याकडे आल्याचा आनंद पै कुटुंबीयांना झाला, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे आभार मानताना दत्ताराम पै भावूक झाल्याचं दिसून आलं. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने प्रवक्त्या शितल म्हात्रे, माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे आणि विभाग प्रमुख वैभव भराडकर यांनी पै कुटुंबीयांना गाळ्याचा टाळा उघडून चावी त्यांच्या हाती दिली. यावेळी, गाळ्याचे कुलूप हाती घेतात दत्ताराम यांनी डोक्याने त्या कुलूपाला नमन केले.

कांदिवलीतील मराठी कुटुंबाच्या दुकानावर बळजबरीने कब्जा करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या लालसिंह राजपुरोहित यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपुरोहित यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा आदेश दिला. तसेच, कांदिवली पोलिसांनी त्यांना रविवारी रात्री उशिरा अटकही केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदेंना मुंबईतील राजकीय गुंडगिरीवर टीका करत गरीब कुटुंबाला दुकान परत मिळवून द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर, अवघ्या काही तासांतच आता या नेत्याचं थेट निलंबन करण्यात आलं आहे. दुसरीकडे, राजपुरोहित यांनी हडप केलेला गाळाही पै कुटुंबीयांना परत मिळाला आहे.

लालसिंग राज पुरोहित याने पै. कुटुंबीयांचा दुकानाचा गाळा हडप केला होता. तसेच या दुकानासाठी पै कुटुंबीयांना देण्यात येणारी रक्कमही पुरोहित यांनी दिली नव्हती. अखेर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर 5 वर्षानंतर हक्काचा दुकानाचा गाळा परत मिळाल्याने पै कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या लालसिंग राजपूतमुळे पै. कुटुंबीयांना झालेल्या त्रासाबद्दल शितल म्हात्रे यांनी दिलगिरी व्यक्त केली. यावेळी, एकनाथ शिंदे यांचे आभार मानताना दत्ताराम पै भावूक झाल्याचं दिसून आलं. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने प्रवक्त्या शितल म्हात्रे, माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे आणि विभाग प्रमुख वैभव भराडकर यांनी पै कुटुंबीयांना गाळ्याचा टाळा उघडून चावी त्यांच्या हाती दिली. यावेळी, गाळ्याचे कुलूप हाती घेतात दत्ताराम यांनी डोक्याने त्या कुलूपाला नमन केले.

आमच्या पक्षाचा असला तरी पाठीशी घालणार नाही

पै. साहेबांना त्यांच्या हक्काची जागा, आणि या दुकानाची चावी आज देण्यात आली. आज ते त्यांच्या वास्तूत बसले आहेत. पै साहेबांना जो काही त्रास झाला त्यासाठी आम्ही पक्षातर्फे दिलगिरी व्यक्त करतो. शिंदे साहेबांनी पोलिसांना सांगून जो लालसिंग होता त्या विरोधात कारवाई करण्यास सांगितल्याची माहिती शितल म्हात्रे यांनी दिली. इथे कोणी जर अन्याय केला तर त्याला कोणत्याही परिस्थितीत माफी मिळणार नाही,  मग तो आमचा पदाधिकारी असला तरी.  तो चुकला असेल त्याला शिक्षा होईल, त्याला मागे घातले जाणार नाही, असा संदेश शिंदे साहेबांनी आजच्या घटनेतून दिला, असेही शितल म्हात्रेंनी म्हटले.

हेही वाचा

अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; पायाभूत सुविधा, मुंबई, पुणे, शेतकरी, एका क्लिकवर A टू Z माहिती

अधिक पाहा..

Comments are closed.