महिला पोलिसावर हात टाकला, वर्दीही खेचली, नागपुरातील भयानक CCTV ताब्यात

नागपूर व्होइलेन्स: नागपूरच्या (Nagpur Voilance) चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी (17 मार्च) हिंसाचार सुरू असताना एक लाजिरवाणी घटनाही घडली. महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

नागपूरमधील सोमवारच्या रात्री हिंसाचार नियंत्रित करताना आपल्या कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांचा विनयभंग करणाऱ्या दंगलखोरांवर नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरचा सीसीटीव्ही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपीची ओळख पटवण्याची काम सुरु असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल असे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं?

नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असताना एक लाजिरवाणी घटनाही घडली. महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही माथेफिरूंनी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचे प्रयत्न केला. नागपूरच्या गणेश पेठ पोलीस स्थानकामध्ये असे लाजिरवाणी कृत्य करणाऱ्या जमावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच ठिकाणी असलेल्या इतर महिला पोलिसांनाही जमावातून शिवीगाळ करण्यात आली, तसंच अश्लील शेरेबाजीही करण्यात आली.

22 मार्गावरील 75 बसेसचे संचालन प्रभावित-

महाल भागात झालेल्या तणावामुळे महापालिकेच्या परिवहन विभागाच्या 11 मार्गावरील बसेसचे संचालन पूर्णपणे बंद ठेवण्यात आले तर 11 मार्ग डायव्हर्ट  करण्यात आले. पोलिसांनी कायदा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ज्या भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे त्यामुळे बस संचालन होऊ शकले नाही. अकरा मार्गावरील बस संचालन पूर्णपणे बंद असल्याने 40 फेऱ्या प्रभावित झाल्या आहेत. परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच बसेसचे संचालन पूर्ववत होईल असे मनपाच्या परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम

नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गरज नसताना या भागातील लोकांनी  घराबाहेर निघू नये, तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु असून लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, अद्याप नागपूर शहरातील काही भागात तणावपूर्ण शांतता  कायम असल्याचे दिसत आहे.

संबंधित बातमी:

नागपूर सावरतंय! 11 पोलीस ठाणे हद्दीतील प्रभावित क्षेत्रात संचारबंदी अनिश्चित काळासाठी कायम; टप्प्याटप्प्यात ढील देण्याचा पोलिसांचा निर्णय

अधिक पाहा..

Comments are closed.