गौतमी पाटीलला चक्क बैलासमोर नाचवलं! हुंड्यासाठी वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबियांचा प्रताप
वैष्णवी हागावणे पुणे गुन्हा: वैष्णवी हगवणेचा हुंडाबळी (Vaishnavi Hagawane Death) गेल्यानंतर तिला छळणाऱ्या हगवणे कुटुंबियांचे आता एक एक धक्कादायक प्रताप समोर येऊ लागले आहेत. सुनांना छळून त्यांच्या कुटुंबीयांकडून वसूल केलेल्या पैशांवर हगवणे कुटुंबीयांनी (राजेंद्र हागावणे) चक्क तमाशे केल्याचे समोर आले आहे. बडेजाव करणाऱ्या हगवणे कुटुंबियांनी चक्क त्यांच्या बैलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यातील प्रसिद्ध नृत्य कलाकार गौतमी पाटील (Gautami Patil) यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमाच्या मंचामागे असणारा फोटो हा सुशील हगवणे (Sushil Hagawane) यांचा असून तो वैष्णवीचा दीर आहे. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतो आहे.
दरम्यान, एकीकडे सुनेला जनावरापेक्षा वाईट वागणूक द्यायची, तर दुसरीकडे सुनांना छळून त्यांच्या कुटुंबीयांकडून पैसे वसूल करायचे आणि त्या पैशांवर बडेजाव करायचा. हे कृत्य अगदी जनावरलाही लाजवणारे आहेत. त्यामुळे अशा लोकांना तातडीनं वेसण घालण्याची गरज असल्याची मागणी आता सर्वत्र केली जात आहे.
सुनेला जनावरापेक्षा वाईट वागणूक, हुंड्याच्या पैशांवर बैलाचा बर्थडे
पुढे आलेल्या माहितीनुसार, हगवणे कुटुंबीयांच्या एका लाडक्या बैलाच्या वाढदिवशी होता. त्यासाठी मोठ्या कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आलं. मात्र या कार्यक्रमाचे स्वरूप साऱ्यांना थक्क करणारे होतं. बैलाच्या बर्थडे पार्टीला प्रसिद्ध नृत्य कलाकार गौतमी पाटीलला चक्क बैलासमोर नाचवण्याचा उद्योग हगवणे कुटुंबीयांनी केला आहे. याच कार्यक्रमाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत.
मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावणारी गौतमी पाटील यावेळी एका बैलासमोर नाचत असल्याचे बघून अनेकांना धक्का बसला आहे. करण एरवी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला होणारी चाहत्यांची तूफान गर्दी आणि तीचे चाहते यापैकी इथं कोणीही नाहीत. समोर आहे तो चक्क एक बैल. दरम्यान, व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या गौतमीच्या कार्यक्रमातील स्टेजवर लावण्यात आलेल्या बॅनरवर सुशील राजेंद्र हगवणेचा फोटो आहे. सुशील हा वैष्णवीचा दिर होता. याचाच अर्थ हगवणे कुटुंबीयांनी सुनेच्या माहेरकडून हुंडा उकळला आणि बैलाच्या वाढदिवसासाठी तो गौतमी पाटीलवर उधळला. असही आता बोललं जात आहे. मात्र या संपूर्ण प्रकारानं राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे.
https://www.youtube.com/watch?v=eidlvbounau
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.