अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, विजय वडेट्टीवारांचे एका शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले..

Vijay Wadettiwar on Amol Kolhe नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना जोरदार टोला लगावलाय. विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही, तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही. राज्यात मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस आहे. तर पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणांत होतो त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत. लक्षात ठेवा बचेंगे तो और भी लढेंगे, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी मविआच्या मित्रपक्षांना टोला लगावला आहे.

दरम्यान अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून ही प्रत्युत्तर देण्यात आले  असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या वक्तव्यावरुन प्रत्युत्तर देत अमोल कोल्हेंना सल्ला दिला आहे.

आम्हाला सल्ला कमी द्यावा – विजय वडेट्टीवार

एका वृत्तपत्राचा अग्रलेख वाचला तर सगळं लक्षात येईल की,  9 कोटींवर मतदान वाढले आहे. झोल झालं करून हे सरकार आले आहे. EVM च्या भरवशावर हे सरकार सत्तेत आले आहे. पाश्वी बहुमत संदर्भात चर्चा करत आहे. किंबहूना अमोल कोल्हेंना एवढंच सांगतो त्यांनी स्वत:च  पक्षाकडे जास्त लक्ष देऊन आम्हाला सल्ला कमी द्यावा. असे विजय वडेट्टीवार म्हणाले. राज्यात कंत्राटदाराचे हजारो कोटी रुपये थकले आहेत. नवीन टेंडर झाले तरी काम करायला तयार नाही. पैसे घेऊन लायसन्स देतात. त्यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. रेशन कंत्राटदारांच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. गंभीर तक्रारी ह्या कंत्राटदारावर आहे. नागपूरचा असल्यामुळे कोणी पाठीशी घालत असतील तर त्याला ते कंत्राट देऊ नये. याबाबत मुख्यमंत्री यांना मागणी करणार आहे की भाजपच्या नेत्यांनी शिफारस केली असेल ते पाप भाजपच्या माथी असेल. असेही वडेट्टीवार म्हणाले.

अजित दादांना स्वतःचा माणूस आणायचा आहे का?

पुण्यातील कायदा सुव्यवस्था उध्वस्त झाली आहे. मी कोणाच समर्थन करत नाही. या विरोधात बोलत नाही. पोलीस आयुक्तांची मात्र ती जबाबदारी आहे. खुणांच्या घटना वाढल्या, ड्रग विक्री वाढली. कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही. गुंड बाहेर येऊन स्वत:ची मिरवणूक काढून घेतात. अजित दादा स्वतःचा माणूस आणायचा आहे का? पुण्याला दुरूस्त करणारा एखादा अधिकारी आला पाहिजे. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

वाल्मिक कराड दाऊद इब्राहिमच्या बरोबरीचाच-  विजय वडेट्टीवार

वाल्मिक कराड दाऊद इब्राहिमच्या बरोबरीचाच आहे. वाल्मिक कराडला खुणांच्या गुन्ह्याखाली अटक करून पोलिसांना सगळे धागे दोरे शोधायचे असेल, तळात जायचं असेल तर, त्याचा एक महिन्याच्या पीसीआर घेतला पाहिजे. एका वर्षात 1000 पेक्षा जास्त खून होते.मुख्यमंत्र्यांची बिहार संपवण्याची मानसिकता दिसत नाही. धनंजय मुंडेचा राजीनामा घेतल्याशिवाय न्याय मिळेल असं वाटत नाही. अशी प्रतिक्रिया  विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर ते नागपूर येथे बोलत होते. धनंजय बोले पोलीस हाले अशी परिस्थिती आहे, एकही पोलीस अधिकारी धनंजय भाऊच्या शब्दा पलीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे तिथे खून झाला. असेही ते म्हणाले.

आणखी वाचा

Mahavikas Aghadi : लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर

अधिक पाहा..

Comments are closed.