निलेश घायवळ अद्यापही युरोपमध्येच; बायको अन् मुलगा भारतात परतले; चौकशीच्या भीतीने झाले पसार…;
पुणे: पुण्यातील कोथरूड परिसरातील गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्यानंतर चर्चेत आलेली घायवळ गॅंग आणि निलेश घायवळवरती (Nilesh Ghaywal) पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे, तर दुसरीकडे गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) बायको आणि मुलासह युरोपला गेला होता. बायको आणि मुलगा युरोपवरुन परत आले आहेत, मात्र निलेश घायवळ परत आलेला नाही. निलेश घायवळ सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर तीन महिन्यांचा व्हीजा घेऊन युरोपला गेला आहे. परत आलेली त्याची बायको आणि मुलगा पोलीस चौकशीला बोलावतील या भितीने घरी न जाता इतरत्र गायब झाले आहेत. गुन्हा फक्त निलेश घायवळवर दाखल आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (Nilesh Ghaywal)
Nilesh Ghaywal: बायको आणि मुलगा भारतामध्ये परतल्याची माहिती
दरम्यान,सप्टेंबर महिन्याच्या मध्यात निलेश घायवळ हा त्याच्या कुटुंबासह तीन महिन्यांचा व्हीजा मिळवून युरोपला निघून गेला त्यावेळी इथे पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये त्याच्या टोळीतील गुंडांकडून गोळीबार करण्यात आला होते. यामध्ये दोन नागरिक जखमी झाली होते, यानंतर पोलिसांनी मकोका अंतर्गत निलेश घायवळसह त्याच्या टोळीवर कारवाई सुरू केली. मात्र घायवळ युरोपमध्ये असल्यामुळे पोलिसांच्या कारवाईला फक्त औपचारिकता लाभली, दरम्यानच्या काळात त्याची बायको आणि मुलगा भारतामध्ये परतल्याची माहिती आहे. भारतात आल्यानंतर ते दोघे घरी न येता इतरत्र गायब झालेत अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र अद्याप निलेश गायकवाड भारतात आलेला नाही, अर्थातच पोलिसांच्या कारवाईने भीतीने तो भारतात येण्याचा टाळत असावा, मात्र त्याच्या व्हीजाची मुदत तीन महिने आहे, त्यामुळे तो कधी भारतात परततो त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Nilesh Ghaywal: नावातील h काढून टाकला आणि Gaywal असं केलं
हा पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळने नाव देखील बनावट वापरलं. त्यासाठी आडनावाच्या स्पेलिंग मध्ये बदल केला. Ghaywal या नावातील h काढून टाकला आणि Gaywal असं केलं. आश्चर्य म्हणजे पुढील पाच वर्षे याचा पोलिसांना आणि पासपोर्ट कार्यालयाला थांगपत्ता देखील लागला नाही .
Nilesh Ghaywal: त्याचा पासपोर्ट जमा केला नाही
२०२१ मधे निलेश घायवळला पुण्यातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि मकोका कायद्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पुढच्यावर्षी म्हणजे २०२२ मधे घायवळला त्या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मीळाला. तो देताना न्यायालयाने घायवळला त्याचा पासपोर्ट पोलीसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र घायवळ ने त्याचा पासपोर्ट जमा केला नाही आणि पोलीसांनी देखील जमा करुन घेतला नाही. हाच पासपोर्ट वापरुन सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर निलेश घायवळ तीन महिन्यांचा व्हीजा मिळवून युरोपला फिरायला गेला.
आणखी वाचा
Comments are closed.