निलेश घायवळच्या वकिलांचा मोठा दावा; गोळीबारातील आरोपींशी संबंध नाही अन् ओळखतही नाही, पोलिसांनी
पुणे: पुण्यातील कोथरूड गोळीबारानंतर निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. निलेश घायवळ आणि गोळीबार केलेल्या आरोपींचा काहीही संबंध नाही आणि निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) त्यांना ओळखत नसल्याचा दावा केलाय. तसेच पोलिसानी मिडियाच्या दबावाखाली येऊन निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याचे कनेक्शन गोळीबाराशी जोडले आहे का? यासाठी निलेश घायवळ याच्या वकिलांकडून रिट पिटीशन दाखल करण्यात आली आहे.
Nilesh Ghaywal: ही रस्त्यावरती अचानक झालेली भांडण आहेत
प्रकरणी बोलताना निलेश घायवळचे वकील विपुल दुशींग यांनी बोलताना म्हटलं की, रिट पिटीशनद्वारे रस्त्यावरती अचानक झालेल्या भांडणातून एका गटातून दुसऱ्या गटाला गोळीबार केला. त्या गोळीबारामध्ये तो व्यक्ती जखमी झाला अशी केस आहे. पुणे पोलिसांकडून देखील पहिल्या दिवशी जी काही बातमी देण्यात आली होती. त्यांचा म्हणणं असं होतं की, यामध्ये कोणते गॅंग रियल रीजनचा संबंध येत नाही. ही रस्त्यावरती अचानक झालेली भांडण आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही गॅंग नाव नाही. परंतु माध्यमांकडून येणाऱ्या प्रेशरमुळे कदाचित त्यांनी निलेश घायवळला याच्यामध्ये घेतलं. त्याचं नाव या घटनेमध्ये टाकलं का? हे तपासून पहावं. त्यासाठी आम्हीही रिट पेटिशन कोर्टात दाखल केली आहे. निलेश घायवळच्या म्हणण्याप्रमाणे मारेकरी आणि निलेश घायवळ गँगचे आत्ता जे तथाकथित मारेकरी आहेत, जे पकडले गेलेले, त्या लोकांची आणि निलेशची कुठल्याही प्रकारे ओळख नाही त्यांची गाठभेट नाही. त्यांनी कधी एकमेकांना फोनवर सुद्धा बोललेले नाहीत, असं असताना देखील त्याचं नाव या प्रकरणांमध्ये गोवण्यात आलं ही गोष्ट त्यांनी कोर्टामध्ये चॅलेंज केलेली आहे, असं घायवळचे वकील विपुल दुशींग यांनी म्हटलं आहे.
Nilesh Ghaywal: निलेश घायवळची आई काय म्हणाली?
निलेश घायवळ याची आई कुसुम घायवळ यांनी म्हटलं की, माझ्या लेकराला कुठंही पळून जायचं नव्हतं. तो पळून गेला नाही. मी स्वत: त्याला विमानतळावर सोडायला गेले होते. त्याने कोणताही पासपोर्टमध्ये घोटाळा केला नाही. राजकारणी लोकं त्याला त्रास देण्यासाठी असं करत आहेत. निलेश घायवळला राजकारणात प्रवेश करायचा होता. दोन महिन्यावर ज्या निवडणुका आल्या आहेत. त्याला निवडणुकीत उभं रहायचं होतं, असंही त्यांनी म्हटलंय आहे.
नगर जिल्ह्यातील सोनेगावच्या जिल्हा परिषदतून निलेश उभं राहणार होता, मात्र विरोधकांनी कट रचून त्यांना अडकवल्याचा दावा निलेश घायवाळच्या आई कुसुम घायवळ यांनी केला आहे. सोनेगावमध्ये त्याला राजकारणात डोकं वार काढू दिलं जात नव्हतं, त्यामुळे त्याला त्रास दिला जात होता, असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे त्या म्हणाल्या, दोन्ही भावांना राजकारणात उतरायचे होते. मी त्याची आई आहे, खोटे बोलणार नाही. मला दोन लेकरं आहेत. त्यांनी पळून जावे असे कोणात्या आईला वाटते. लेकरांनी खून करावा, असे कुणाला वाटते. पण यामागे मोठं राजकारण आहे. राजकारणी लोक त्याला सुखाने जगू देत नाही. गेल्या काही वर्षापासून त्याने गुन्हेगारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन सुखाने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला, असंही कुसुम घायवळ म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.