कुख्यात गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरू; भारतात आणण्यासाठी मोठं पाऊल, इंटरपोलकडे मागितली मदत,


पुणे: पुण्यातील गुंड निलेश घायवळ (nilesh ghaywal) विरोधात “ब्लू कॉर्नर” नोटीस (blue corner notice) जारी करण्यात आली आहे. इंटरपोलने घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर”  (blue corner notice) नोटीस जारी केली आहे. पुणे पोलिसांकडून इंटरपोलशी पत्र व्यवहारानंतर नोटीस जारी करण्यात आली आहे. फौजदारी गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व्यक्तींची तपासासाठी अतिरिक्त माहिती, ओळख, ठावठिकाणा मिळावा यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस  (blue corner notice) जारी केली जाते. घायवळचा शोध घेण्यासाठी आता पुणे पोलिसांना इंटरपोलची (interpol) मदत घेणार आहे. दि इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ॲार्गनायझेशन म्हणजेच ‘इंटरपोल’ या नावाने ही यंत्रणा ओळखली जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमधील पोलीस आणि गुन्हेगारांच्या माहितीची अंतर्गत सहकार्य या तत्त्वावर यंत्रणेचे काम चालते.  (blue corner notice)

Nilesh Ghaywal: पुणे पोलिसांनी इंटरपोलला पत्र लिहिलं

कोथरुडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरु आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी निलेश घायवळचा शोध देखील पुणे पोलीस घेत आहेत. पण तो परदेशात पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्याला भारतात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून पुणे पोलिसांनी इंटरपोलला पत्र लिहिलं आहे. पुणे पोलिसांची ही मागणी मान्य करत आता इंटरपोल त्याच्या विरोधात ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस जारी केली आहे. त्यामुळे त्याचा शोध आता इंटरपोलकडून घायवळचा शोध घेतला जाणार आहे. फौजदारी गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व्यक्तींची तपासासाठी अतिरिक्त माहिती, ओळख, ठावठिकाणा मिळावा यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते.

Nilesh Ghaywal: घायवळ बंधूंचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज

कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळविरोधात ब्लू कॉर्नर आणि रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. तर त्याचा भाऊ सचिन घायवळवर कोथरूड गोळीबार प्रकरणी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घायवळ बंधूंचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला असून लवकरच या अर्जावर सुनावणी होणार आहे. या टोळीविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.

Nilesh Ghaywal: पासपोर्ट रद्द करण्याची मागणी

कोथरूडमध्ये तरुणावर गोळीबार केल्यानंतर परदेशात पळून केलेला कुख्यात गुंड निलेश घायवळला अटक करायची असून, त्यासाठी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी पुणे पोलिसांनी विशेष ‘मकोका’ न्यायालयाकडे केली. पुणे पोलीस निलेश घायघोळचा पासपोर्ट रद्द करणार आहेत. पोलिस आयुक्तांनी या संदर्भात माहिती दिली होती. पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांशी या विषयावर चर्चा केली. या चर्चेनंतर ही माहिती समोर आली आहे. तपासात असे उघड झाले आहे की, घायवळने बनावट कागदपत्रे आणि चुकीच्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवला होता. पासपोर्ट मिळवण्यासाठी घायघोळने ‘गायवळ’ असे नाव असलेली कागदपत्रे सादर केली होती, असे या तपासात निष्पन्न झाले आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून पासपोर्ट मिळवणे हा गंभीर गुन्हा आहे. पुणे पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत. या घटनेमुळे पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेतील त्रुटी समोर आल्या आहेत.

Nilesh Ghaywal: नेमकं प्रकरण काय?

ही घटना १७ सप्टेंबर रोजी रात्री पावणेबाराला पुण्यातील कोथरूड परिसरामधील मुठेश्वर चौकात घडली होती, तक्रारदार मित्रांसमवेत गप्पा मारत असताना, घायवळ टोळीतील गुंड दुचाकीवरून जात होते. त्यांना जाण्यासाठी रस्ता न दिल्याच्या किरकोळ कारणांवरून भांडणे झाली. त्यातून आरोपींनी धुमाळ यांना मारहाण केली. त्यापैकी एकाने त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर काही वेळाने आरोपींनी सागर कॉलनी परिसरात वैभव साठे याच्यावर कोयत्याने वार केले. आम्ही या भागाचे भाई आहोत, असे म्हणून आरोपींनी दहशत माजवली, असे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी घायवळ टोळीच्या सदस्यांसह टोळीच्या म्होरक्यावरती देखील मकोका अंतर्गत कारवाई केली. यादरम्यानच्या तपासात टोळीप्रमुख निलेश घायवळ फरार असून, तो परदेशात पळून गेला असल्याचं समोर आलं. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस काढली आहे. त्याच्या अटकेसाठी पासपोर्ट रद्द करण्याचा न्यायालयाने आदेश द्यावा, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

आणखी वाचा

Comments are closed.