लक्ष्मी येत असेल तर घ्या मात्र मतदान आम्हाला करा, निलेश राणेंचा भाजपला टोला
Nilesh Rane : मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना निवडणूक कशी जिंकायची हे सांगण्याची गरज नाही. ती युनिव्हर्सिटी आहे. आम्ही विरोधात असताना दीपक केसरकर यांनी आम्हाला हैराण केलं होत आणि ते नेहमी जिंकायचे असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी दिपक केसरकर यांचे कौतुक केले. मंत्रालयात दीपक केसरकर यांच्या नावाच वजन आहे. निवडक कामासाठी निलेश राणे आहे, बाकी इतर कामात दीपक केसरकर यांना फोन करा असेही राणे म्हणाले. एकनाथ शिंदे यांना आयुष्यात कधीही सोडणार नाही असेही निलेश राणे यावेळी म्हणाले. लक्ष्मी येत असेल तर घ्या मात्र आम्हाला मतदान करा. जे पैसे देत आहेत, ते नगरपरिषदेत काम करणार नाहीत अशी टीका देखील निलेश राणे यांनी भाजपवर केली.
निधी दीपक केसरकर यांनी आणला, मात्र भाजपने मार्केटिंग केलं
पुढेची 25 शिवसेनेची सत्ता राहिली पाहिजे असं काम करा असे निलेश राणे म्हणाले. दीपक केसरकर यांनी आणलेल्या निधींचा कार्य अहवाल पाहून निलेश राणे यावेळी भारावले. आमदार झाल्यावर कळलं आणतोय कोण आणि खातोय कोण? वेंगुर्ले नगरपरिषदेत आणलेला निधी हा दीपक केसरकर यांनी आणला, मात्र भाजपने मार्केटिंग केलं, ते आपल्याला शिकलं पाहिजे असेही निलेश राणे म्हणाले.
लक्ष्मी येत असेल तर घ्या मात्र आम्हाला मतदान करा
लक्ष्मी येत असेल तर घ्या मात्र आम्हाला मतदान करा. जे पैसे देत आहेत, ते नगरपरिषदेत काम करणार नाहीत अशी टीका देखील निलेश राणे यांनी भाजपवर केली. ते आता जेवढे पैसे देतायेत त्याच्या डबल वसूल करणार, आम्ही तिकडे होते आम्हाला देखील हे दर माहिती नव्हते असे निलेश राणे म्हणाले. मागच्या 10 दिवस आम्ही दाखवलं आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही घाबरणारी अवलाद नाही. 200 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी व्हिजन पाहा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 18 प्लॅटपॉर्म उभारले, आजही तेव्हढेच आहेत. दूरदृष्टी ठेवून विकास करा असे निलेश राणे म्हणाले.
धमकी आली तर निलेश राणे येणार, कुठल्याही धमकीला भीक घालू नका
दीपक केसरकर आजारी असतानाही निवडणुकीत फिरत आहेत. धमकी आली तर निलेश राणे येणार, कुठल्याही धमकीला भीक घालू नका असेही निलेश राणे म्हणाले. नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन निलेश राणे विरुद्ध भाजप असा सामना रंगत असल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.